All New Tata Altroz ची बाजारात धमाकेदार एंट्री; स्टायलिश लूकसह किंमत फक्त 6.89 लाख रुपये

All New Tata Altroz : भारतीय बाजारात टाटाने मोठा धमाका करत नवीन टाटा अल्ट्रोज (Tata Altroz) लॉंच केली आहे. भारतीय बाजारात या कारची एक्स-शोरूम किंमत 6.89 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. या कारसाठी 2 जूनपासून बुकिंग सुरु होणार आहे. कंपनीने जुन्या मॉडेलच्या तुलनेत या कारमध्ये लूक-डिझाइन, प्रीमियम इंटीरियर आणि भन्नाट फीचर्स दिले आहे. टाटाने भारतीय बाजारात या कारचे 10 नवीन व्हेरियंट लॉंच केले आहे. तसेच कंपनीने या कारमध्ये स्मार्ट, प्युअर, क्रिएटिव्ह आणि अकम्प्लिश्ड सारख्या ट्रिम पर्यायांमध्ये ही कार लॉंच केली आहे.
बाजारात या कारची एक्स शोरुम किंमत 6.89 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 11.29 लाख रुपयांपर्यंत जाते. कंपनीकडून या कारमध्ये 5 स्पीड मॅन्युअल, डीसीए आणि नवीन 5 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्यायांसह 3 इंजिन पर्याय देण्यात आले आहे.
All New Tata Altroz इंटीरियर
कंपनीने नवीन टाटा अल्ट्रोजमध्ये लूक आणि डिझायनमध्ये बदल केला आहे. या कारच्या इंटिरियरमध्ये नवीन 3D ग्रिल्स, पुन्हा डिझाइन केलेले हेडलॅम्प आणि टेललॅम्प, इन्फिनिटी कनेक्टिंग रियर एलईडी बार, एलईडी लाईट्स, नवीन डिझाइन केलेले अलॉय व्हील्स, फ्लश डोअर हँडल्स सारखे फीचर्स देण्यात आले आहे. तसेच नवीन व्हेरियंटमध्ये 345-लिटर बूट स्पेस देखील कंपनीकडून देण्यात आले आहे. तर अल्ट्रोजच्या सीएनजी व्हेरियंटमध्ये 210 लिटरची बूट स्पेस आहे. नवीन अल्ट्रोज 5 रंग पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.
All New Tata Altroz फिचर्स
नवीन टाटा अल्ट्रोज फेसलिफ्टमध्ये ग्रँड प्रेस्टिगिया डॅशबोर्ड आणि बिझनेस क्लास फीचर्ससह अधिक हेडरूम आणि हिपरूम आहेत. याशिवाय, यात अल्ट्रा व्ह्यू डिजिटल कॉकपिट, 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, इन-बिल्ट मॅपसह मोठा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले आणि ब्लाइंड व्ह्यू मॉनिटर आहे. यासोबतच, या प्रीमियम हॅचबॅकमध्ये 360 डिग्री एचडी सराउंड व्ह्यू कॅमेरा, गॅलेक्सी अँबियंट लाइटिंग, वायरलेस चार्जर, एअर प्युरिफायर, व्हॉइस असिस्टन्स, सनरूफ, 65 वॅट फास्ट चार्जिंग, एक्सप्रेस कूलिंग आणि आयआरए कनेक्टेड कार टेक्नॉलॉजीसह फीचर्स देण्यात आले आहे. तसेच या कारमध्ये सुरक्षा फीचर्समध्ये ६ एअरबॅग्ज देखील देण्यात आले आहे.
सोने तस्करी प्रकरण, उपमुख्यमंत्री डीके शिवकुमारकडून गृहमंत्र्यांची पाठराखण
All New Tata Altroz इंजिन
नवीन टाटा अल्ट्रोजमध्ये पेट्रोल आणि डिझेलसोबतच सीएनजी पॉवरट्रेन देखील उपलब्ध आहे. ही हॅचबॅक 1.2 लिटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल आणि सीएनजीसह 1.2 लिटर टर्बो पेट्रोल आणि 1.5 लिटर डिझेल इंजिन पर्यायांसह उपलब्ध आहे, जे 5 स्पीड मॅन्युअल आणि 6 स्पीड डीसीए तसेच नवीन 5 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्याय देण्यात आले आहे.