कोणत्या बँकेचे गृहकर्ज सर्वात स्वस्त? SBI, HDFC, ICICI सह प्रमुख बँकांचे दर जाणून घ्या…

Home Loan Interest Rate: आरबीआयने रेपो दर 5.25 टक्क्यांवर कायम ठेवला आहे. त्यामुळे सध्यातरी गृहकर्जाच्या ईएमआयवर अतिरिक्त भार पडण्याची शक्यता कमी झाली आहे.

Home Loan

Home Loan

Home Loan Interest Rate : स्वत:चे घर असावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. मोठे शहर असो की छोटे शहरात घरांच्या किंमती वाढल्या आहेत. रोख घर घेण्याचे दिवस संपले आहेत. गृहकर्जाशिवाय घराचे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे घर खरेदीचा विचार करणाऱ्यांचे लक्ष सर्वप्रथम गृहकर्जाच्या व्याजदरांकडे असते


गृहकर्जाचा ईएमआय वाढणार नाही

जून 2026 मध्ये गृहकर्ज घेणाऱ्यांसाठी दिलासादायक बाब आहे. कारण भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) आपल्या पतधोरण आढाव्यात रेपो दर 5.25 टक्क्यांवर कायम ठेवला आहे. त्यामुळे सध्यातरी गृहकर्जाच्या ईएमआयवर अतिरिक्त भार पडण्याची शक्यता कमी झाली आहे.


5 कोटींच्या सोने तस्करी प्रकरणावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल; रवींद्र चव्हाणांवर केले गंभीर आरोप


रेपो दर म्हणजे काय ?

आरबीआय इतर बँकांना ज्या व्याजदराने अल्प मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देते, त्याला रेपो रेट म्हणतात. रिझर्व्ह बँकेकडून ज्या व्याजदराने कर्ज मिळत असेल त्यावर देशभरातल्या बँका आपल्या ग्राहकांना व्याजदर ठरवतात. जर रेपो रेट वाढला तर जास्त व्याजदार आणि रेपो रेट कमी झाला तर व्याजदर कमी असे सूत्र आहे. यावेळी आरबीआयने दरांमध्ये कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे सध्याच्या आणि नव्या गृहकर्जधारकांना दिलासा मिळाला आहे.


तुळापूर रेव्ह पार्टीवर तेजस्विनी सातपुतेंचा मोठा खुलासा; 100 हून अधिक तरुण-तरुणी पोलिसांच्या ताब्यात


प्रमुख बँकांचे गृहकर्जावरील व्याजदर (टक्क्यांमध्ये)

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) : 7.25 ते 9.05
बँक ऑफ बडोदा : 7.20 ते 9.25
सेंट्रल बँक ऑफ इंडिया : 7.10 पासून
बँक ऑफ इंडिया : 7.10 पासून
युनियन बँक ऑफ इंडिया : 7.15 पासून
कॅनरा बँक : 7.25 पासून
इंडियन ओव्हरसीज : 7.10 पासून
आयसीआयसीआय : 7.50 पासून
कोटक महिंद्रा बँक : 7.60 पासून
एचडीएफसी बँक -7.75 पासून
ॲक्सिस बँक : 8 ते 11.90 टक्क्यांपर्यंत


गृहकर्ज घेताना या गोष्टीही बघा ?

गृहकर्ज निवडताना केवळ व्याजदर पाहणे पुरेसे नसते. प्रोसेसिंग फी, प्री-पेमेंट आणि फोरक्लोजर शुल्क, कर्जाचा कालावधी, क्रेडिट स्कोअर आणि इतर अटी-शर्ती यांचाही एकूण खर्चावर परिणाम होतो. अनेकदा किंचित जास्त व्याजदर असलेले कर्ज, कमी अतिरिक्त शुल्क आणि चांगल्या सुविधांमुळे अधिक फायदेशीर ठरू शकते.


कर्ज देणे कशावर ठरतं ?

गृहकर्जाचे व्याजदर वेळोवेळी बदलू शकतात. तसेच ते ग्राहकाची आर्थिक स्थिती, उत्पन्न, क्रेडिट स्कोअर आणि संबंधित बँकेच्या धोरणांवर अवलंबून असतात. कोणताही आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी संबंधित बँकेच्या अधिकृत माहितीस पडताळून पाहणे आवश्यक आहे.

Exit mobile version