Vijay Mallya : मी अजूनही ‘चोर’ आहे का? मला कधी ना कधी न्याय नक्कीच मिळेल

Vijay Mallya : मी अजूनही 'चोर' किंवा 'फसवणूक करणारा' आहे का? मी माझ्या स्वतःच्या पैशातून ऐषारामात आयुष्य जगलो आणि हाच माझा सर्वात मोठा

  • shakir sayyad
  • Written By: Published:
Vijay Mallya

Vijay Mallya : मी अजूनही ‘चोर’ किंवा ‘फसवणूक करणारा’ आहे का? मी माझ्या स्वतःच्या पैशातून ऐषारामात आयुष्य जगलो आणि हाच माझा सर्वात मोठा गुन्हा ठरला, ज्यासाठी मला शिक्षा दिली जात आहे. आपल्या सर्वांच्या वर एक देव आहे. कधी ना कधी न्याय नक्कीच मिळेल अशी पोस्ट केल्याने पुन्हा एकदा सोशल मीडियावर विजय मल्ल्या चर्चेत आहे.

किंगफिशर एअरलाइन्सचा (Kingfisher Airlines) संस्थापक विजय मल्ल्या (Vijay Mallya) 2016 मध्ये भारतातून ब्रिटनला पळून गेला होता. त्याला 2019 मध्ये फरार आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्याच्या प्रत्यार्पणासाठी भारत सरकारकडून प्रयत्न सुरु आहे.

कर्नाटक उच्च न्यायालयाच्या एका जुन्या आदेशातील फोटो शेअर करत लिहिले की, कर्नाटक उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिलेला आदेश. कृपया तो काळजीपूर्वक वाचावा, अशी माझी नम्र विनंती आहे. मी अजूनही ‘चोर’ किंवा ‘फसवणूक करणारा’ आहे का? मी माझ्या स्वतःच्या पैशातून ऐषारामात आयुष्य जगलो आणि हाच माझा सर्वात मोठा गुन्हा ठरला, ज्यासाठी मला शिक्षा दिली जात आहे. आपल्या सर्वांच्या वर एक देव आहे. कधी ना कधी न्याय नक्कीच मिळेल अशी पोस्ट केल्याने पुन्हा एकदा सोशल मीडियावर विजय मल्ल्या चर्चेत आहे.

विजय मल्ल्याकडून शेअर करण्यात आलेला फोटो कर्नाटक उच्च न्यायालयाने (Karnataka High Court) 2018 मध्ये दिलेल्या एका निर्णयातील आहे. या आदेशात 17 डिसेंबर 2024 रोजी अर्थमंत्र्यांनी लोकसभेत दिलेल्या वक्तव्याचा संदर्भ देण्यात आला आहे. त्या माहितीनुसार, मल्ल्याकडून युनायटेड ब्रुअरीज लिमिटेडमधील शेअर्सव्यतिरिक्त तब्बल 14,131.6 कोटी रुपयांची मालमत्ताा बँकांच्या कंसोर्टियमकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. तर किंगफिशर एअरलाइन्सवर बँकांचे मूळ कर्ज 6,203 कोटी रुपये होते. याबाबत खंडपीठाने नमूद केले की, कर्जाच्या रकमेपेक्षा दुपटीहून अधिक वसुली झाली असल्यामुले बँकांचे बाकी थकीत पैसे आता जवळपास पूर्ण वसून झाले आहेत. त्यामुळे आता बँकांनी यूबीएलच्या शेअर्सवर दावा सांगण्यात काहीही औचित्य उरलेले नाही.

बँकांचा युक्तिवाद

सध्या लंडनमध्ये वास्तव्यास असलेले विजय मल्ल्या यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून आपल्याविरुद्धचे फौजदारी खटले रद्द करण्याची मागणी केली आहे. त्यांनी असा युक्तिवाद केला की, बँकांसोबतचा त्यांचा वाद मिटला आहे, कारण बँकांनी त्यांची संपूर्ण थकबाकी वसूल केली आहे. मात्र, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) नेतृत्वाखालील बँकांच्या समूहाने नुकतेच मुंबई उच्च न्यायालयाला कळवले की, ऑगस्टपर्यंत मल्ल्याकडून सुमारे 8,752 कोटी रुपयांची वसुली होणे बाकी आहे. जरी ‘डेट रिकव्हरी ऑफिसर’ (DRO) यांनी याआधीच 10,270 कोटी रुपयांची वसुली केली असली, तरीही ही रक्कम येणे बाकी आहे.

बँकांनी न्यायालयाला हेही स्पष्ट केले की, या प्रकरणाच्या संदर्भात जप्त केलेले काही शेअर्स अजूनही तसेच आहेत आणि त्यांची विक्री झालेली नाही. बँकांनी ‘डेट रिकव्हरी ट्रिब्युनल’ (DRT) द्वारे आणि जप्त केलेली मालमत्ता विकून किंवा तिचे रोखीकरण करून वसुलीची प्रक्रिया सुरू ठेवली आहे. दरम्यान, अंमलबजावणी संचालनालय (ED) आणि केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) यांनी मल्ल्याविरुद्ध कारवाई सुरू केली आहे. त्यांच्यावर किंगफिशर एअरलाईन्सला दिलेल्या कर्जाच्या संदर्भात बँक फसवणूक, गुन्हेगारी कट आणि मनी लाँड्रिंगचा आरोप ठेवण्यात आला आहे.

मोठी बातमी, अभिनेता इम्रान खानला भारत सोडण्याचे आदेश-

फरार घोषित

अंमलबजावणी संचालनालयाचे (ED) म्हणणे आहे की, वसुलीमुळे दिवाणी दावे निकाली निघू शकतात, परंतु त्यामुळे ‘प्रिव्हेंशन ऑफ मनी लाँड्रिंग ॲक्ट’ (PMLA) अंतर्गत सुरू असलेली फौजदारी कारवाई आपोआप संपत नाही. मल्ल्याने असा युक्तिवाद केला होता की, कर्जदारांनी वसूल केलेली एकूण रक्कम थकबाकीपेक्षा जास्त असल्याने, त्याच्याविरुद्धची कारवाई थांबवली जावी. मल्ल्या मार्च 2016 मध्ये देश सोडून पळून गेला होता आणि तेव्हापासून सरकारने त्याला ‘फरार’ घोषित केले आहे.

follow us