धक्कादायक! संरक्षण क्षेत्रातील गोपनीय माहिती लीक? म्यूनिशंस इंडिया लि. च्या कार्यकारी संचालकासह तिघांना अटक
Confidential defense information leaked प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) मोठी कारवाई केली आहे.
Confidential defense information leaked Three arrested, including Executive Director of Munitions India Ltd : संरक्षण क्षेत्राशी संबंधित गोपनीय माहिती खासगी कंपनीला दिल्याचा आणि लाच घेतल्याचा आरोप असलेल्या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) मोठी कारवाई केली आहे. सरकारी कंपनी म्युनिशन्स इंडिया लिमिटेडचे (MIL) कार्यकारी संचालक अनिल कुमार आणि दारूगोळा उत्पादक कंपनी एसएमपीपीचे (SMPP) मुख्य कार्यकारी अधिकारी आशीष कंसल यांना सीबीआयने अटक केली आहे. या प्रकरणात अनिल कुमार यांचा भाऊ बी. हर्षवर्धन यालाही अटक करण्यात आली आहे.
अखेर केंद्र सरकारने माघितली माफी! दिल्ली इंटरनेट बंदी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयने बजावली होती नोटीस
सीबीआयच्या माहितीनुसार, हे प्रकरण एसएमपीपी कंपनीला दारूगोळा पुरवठ्यासाठी देण्यात आलेल्या ५०० कोटी रुपयांच्या कंत्राटाशी संबंधित आहे. पुण्यातील म्युनिशन्स इंडिया लिमिटेडमध्ये कार्यरत असलेल्या अनिल कुमार यांनी खासगी कंत्राटदार आणि पुरवठादारांशी संगनमत केल्याचा आरोप आहे. सरकारी लाभ मिळवून देण्याच्या बदल्यात तसेच संरक्षण उत्पादन, खरेदी आणि सामरिक हालचालींशी संबंधित संवेदनशील माहिती उघड करण्यासाठी त्यांनी लाच मागितली आणि स्वीकारली, असा सीबीआयचा दावा आहे.
The CBI has arrested the Executive Director of Munitions India Limited (MIL) and two other private individuals in a bribery case
The case was registered on October 12, 2026, over allegations that the accused public servant, while serving as Executive Director at MIL in Pune, demanded and accepted illegal gratification in connivance with private contractors and vendors in exchange for extending official favours.
During searches at the public servant’s premises in Pune, the CBI recovered ₹1.73 crore in cash. Searches at premises in Mysuru, Bengaluru and Delhi led to the recovery of approximately ₹50 lakh in cash and incriminating documents. The investigation is ongoing.
The three accused arrested by the CBI in the bribery case are: Anil Kumar, Executive Director, Munitions India Limited (MIL), Ashish Kansal, CEO and Director/Promoter of M/s SMPP Ltd, and Harshavardhan, brother of Anil Kumar.
(Source: CBI)
— ANI (@ANI) October 14, 2026
मोठी बातमी, अभिनेता इम्रान खानला भारत सोडण्याचे आदेश
या प्रकरणी सीबीआयने सोमवारी प्रथम माहिती अहवाल (FIR) दाखल केला होता. गोपनीय माहिती उघड केल्यामुळे देशाच्या सामरिक हितसंबंधांना आणि राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकत होता, असे तपास यंत्रणेने म्हटले आहे.सीबीआयच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात अनिल कुमार यांच्या निवासस्थानाची झडती घेतली असता 1.73 कोटी रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली. याशिवाय म्हैसूर, बंगळुरू आणि दिल्ली येथे करण्यात आलेल्या झडतीदरम्यान सुमारे 50 लाख रुपये रोख आणि काही संवेदनशील कागदपत्रे आढळून आली. कंत्राटासंदर्भात आशीष कंसल आणि अनिल कुमार यांच्यात नियमित संपर्क होता, असा आरोपही सीबीआयने केला आहे.
एसएमपीपी कंपनीचा कर्मचारी रवित कुमार तेवतिया हादेखील कथितरीत्या अनिल कुमार यांच्या संपर्कात होता. सीबीआयच्या म्हणण्यानुसार, कथित बेकायदेशीर रकमेचा मोठा हिस्सा अनिल कुमार यांच्या पत्नी आणि भावाच्या माध्यमातून लपवण्यात आला होता. दरम्यान, या प्रकरणावर एसएमपीपी कंपनीकडून तातडीने कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.