Download App

Adani Group : सर्वोच्च न्यायालयाच्या क्लीन चिटनंतर अदानी समूहाच्या शेअर्सची मुसंडी…

Adani Group : अदानी समूहासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या समितीचा अहवाल उघड झाल्यानंतर अदानी समूहाच्या शेअर्सने शेअर बाजारात मुसंडी मारली आहे. अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये भरघोस वाढ झाल्याचं आज पाहायला मिळालंय. तसेच सर्वोच्च न्यायालयात हिंडनबर्गप्रकरणी अदानी समूहाला क्लीनचीट देण्यात आली असून प्राथमिक तपासात कोणत्याही कायद्याचे उल्लंघन झाल्याचं स्पष्ट झालेलं नाही. त्याचप्रमाणे सेबीला किंमतीच्या बदलाचीही संपूर्ण माहिती देण्यात आली होती.

हवाई प्रवासाला झटका! परदेशवारी महागणार, मोदी सरकारने ‘या’ करात केली वाढ

शेअर बाजारात आज दुपारच्या सुमारास अदानी समूहाचे शेअर्स 3.89 टक्क्यांनी वाढले आहेत. तसेच अदानी ग्रीन, अदानी पॉवर, अदानी ट्रान्समिशनचे शेअर्सही वर जात असल्याचं दिसून येतंय. अदानी पोर्ट्सचे शेअर्स 2.82 टक्क्यांनी वाढले तर एडब्लूएलते शेअर्स 6 टक्क्यांनी वाढलेत. एनडीटीव्हीचे शेअर्सही 4.52 टक्क्यांनी वाढले असून अंबुजा सिमेंटच्या शेअर्समध्येही तेजी दिसून आली. एसीसीच्या शेअरमध्येही 1.43 टक्क्यांची वाढ दिसून येत आहे.

Pune : शरद पवारांसमोरच अजित पवारांची ‘दादागिरी’; भर बैठकीत चंद्रकांत पाटलांना धरलं धारेवर

अदानी समूहातील कंपन्यांच्या व्यवहारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. अदानी समूह मोठ्या कर्जामुळे दबाबाखाली येऊ शकतो, त्याशिवाय, अदानी समूहाने शेअर दरात वाढ करण्यासाठी फेरफार आणि इतर प्रकार केले आहेत. तसेच अदानी समूहाने मॅनिप्युलेशन आणि अकाउंटिंग फ्रॉड केल्याचा दावा हिंगनबर्गच्या अहवालात करण्यात आला होता.

सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना पुणेरी टोमणा; म्हणाल्या, अशाने दरवेळेस कोणी…

दरम्यान, हिंडनबर्गच्या आरोपांवर अदानी ग्रुपने 413 पानांचं उत्तर देण्यात आलं होतं. हिंडनबर्गचे आरोप म्हणजे भारतावरील हल्ला असून बदनाम करण्यासाठी हिंडनबर्गचे आरोप निराधार आहे. मॅडऑफ्स ऑफ मॅनहट्टन’ हिंडनबर्ग रिसर्चचा अहवाल वाचून आम्हाला धक्का बसला आहे. आम्ही अत्यंत अस्वस्थ झालो आहोत, हा अहवाल खोटा असल्याचा दावा अदानी समूहाकडून करण्यात आला होता.

Tuljapur News: प्रचंड टिकेनंतर तुळजाभवानी मंदिराची माघार; कपड्यांचा निर्णय बदलला

अमेरिकन संशोधन संस्था हिंडनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहाची संपत्ती घसरली होती. त्यांचे अनेक शेअर गडगडल्याचं पाहायला मिळालं होतं. परदेशी गुंतवणूकदारांच्या भूमिकेमुळे अदानी समूहासमोर अडचणींचा डोंगर उभा ठाकला होता. त्यानंतर मॉरिशस रेग्युलेटर फायन्सीयल सर्व्हिस कमिशन (FSC)ने अदानी ग्रुपला क्लीन चीट दिली.अदानी समूहाच्या ३८ कंपन्या आणि ११ ग्रुप फंडांची आम्ही तपासणी केली. या तपासणीत कुठेही कायद्याचे उल्लंघन झाल्याचे आम्हाला आढळले नसल्याचं FSC ने म्हटलं आहे.

दरम्यान, हिंडेनबर्ग प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त समितीने अदानी समूहाला क्लीन चिट दिल्यानंतर आता अदानी समूहाच्या शेअर्सने शेअर बाजारात मुसंडी मारली असल्याचं दिसून आलं आहे.

Tags

follow us