Download App

जबरदस्त मायलेज अन् भन्नाट फीचर्स, 10 लाखांपेक्षा कमी किमतीमध्ये खरेदी करा ‘ह्या’ कार्स

Affordable SUVs Cars In India : कमी किमतीमध्ये जास्त मायलेज आणि भन्नाट फीचर्ससह येणारी कार तुम्ही खरेदीसाठी शोधात असाल तर तुमच्यासाठी भारतीय

Affordable SUVs Cars In India : कमी किमतीमध्ये जास्त मायलेज आणि भन्नाट फीचर्ससह येणारी कार तुम्ही खरेदीसाठी शोधात असाल तर तुमच्यासाठी भारतीय बाजारात (Indian Market) काही जबरदस्त कार्स उपलब्ध आहे. या कार्सना तुम्ही 10 लाखांपेक्षा कमी किमतीमध्ये खरेदी करू शकतात. या लेखात जाणून घ्या तुम्ही भारतीय बाजारात 10 लाखांपेक्षा कमी किमतीमध्ये कोणत्या कोणत्या कार्स खरेदी करू शकता.

Maruti Celerio

देशाची सर्वात मोठी ऑटो कंपनी मारुती सुझुकी देखील ग्राहकांना कमी किमतीमध्ये जबरदस्त फीचर्स आणि उत्तम मायलेजसह Maruti Celerio 10 लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीमध्ये ऑफर करते. कंपनीकडून या कारमध्ये 1.0-लिटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. ही कार मॅन्युअल व्हेरियंटमध्ये 25.24 kmpl पर्यंत मायलेज देते तर ऑटोमॅटिक व्हेरियंटमध्ये 26.68 kmpl पर्यंत मायलेज देते. बाजारात या कारची एक्स शोरूम किंमत 5.36 लाख ते 7.10 लाखांपर्यंत आहे .

Maruti S-Presso

Maruti Celerio सह तुम्ही Maruti S-Presso देखील 10 लाखांपेक्षा कमी किमतीमध्ये खरेदी करू शकतात. या कारमध्ये 1.0-लिटर पेट्रोल इंजिन देण्यात आले असून ही स्टाईल्स कार ऑटोमॅटिक व्हेरियंटमध्ये 25.3 kmpl आणि मॅन्युअल व्हेरियंटमध्ये 24.76 kmpl मायलेज देते. या कारची भारतीय बाजारात एक्स शोरूम किंमत 4.26 लाखांपासून 6.11 लाखांपर्यंत आहे.

Maruti Alto K10

देशाची सर्वात लोकप्रिय कार्सपैकी एक असणारी Maruti Alto K10 देखील तुम्ही 10 लाखांपेक्षा कमी किमतीमध्ये खरेदी करू शकतात. या शानदार कारमध्ये 1.0-लिटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. तर Maruti Alto K10 मॅन्युअल पेट्रोल व्हेरिएंट 24.39 kmpl मायलेज देते. बाजारात या कारची एक्स शोरूम किंमत 4 लाख रुपये आहे.

Maruti WagonR

दरमहा सर्वात जास्त विक्री होणाऱ्या कार्समध्ये टॉप 10 मध्ये असणारी मारुतीची शानदार कार Maruti WagonR भारतीय बाजारात एक्स शोरूम 5.54 लाख ते 8.50 लाखांमध्ये उपलब्ध आहे. या कारमध्ये ग्राहकांना 1.0-लिटर, 3-सिलेंडर पेट्रोल आणि 1.2-लिटर, 4-सिलेंडर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. कंपनीच्या दाव्यानुसार ही कार 23.9 kmpl पर्यंत मायलेज देते.

Maruti Swift

बोल्ड लूक, शानदार मायलेज आणि उत्तर फीचर्समुळे भारतीय बाजारात आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारी Maruti Swift देखील भारतीय बाजारात 10 लाखांपेक्षा कमी किमतीमध्ये उपलब्ध आहे. ग्राहकांना या कारमध्ये नवीन 1.2-लिटर K सिरीज, 3-सिलेंडर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे.

येरवडा पोलीस ठाण्यातील दोन पोलीस अधिकारी निलंबित…

Swift चे ऑटोमॅटिक व्हेरियंट 25.75 kmpl पर्यंत मायलेज देते आणि मॅन्युअल व्हेरियंट 24.8 kmpl पर्यंत मायलेज देते. भारतीय बाजारात या कारची एक्स शोरूम किंमत 6.50 लाखांपासून सुरु होते.

follow us

संबंधित बातम्या