Download App

AI चा मोठा फटका! पेटीएमने काढले तब्बल एक हजार कर्मचारी

  • Written By: Last Updated:

AI : गेल्या काही दिवसांपासून एआय (AI) या तंत्रज्ञानाचे अनेक फायदे समोर येत आहेत. त्यामध्ये याच तंत्रज्ञानाचे काही तोटे देखील समोर येत आहेत. त्यामथील पहिला तोटा म्हणजे या तंत्रज्ञानामुळे लोकांच्या नोकऱ्यांवर गदा येत आहे. असाच प्रकार घडला आहे. डिजीटल पेमेंट कंपनी पेटीएमच्या (Paytm) तब्बल एक हजार कर्मचाऱ्यांसोबत झाला आहे. पेटीएमने एआयमुळे या एक हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे.

IND vs SA 1st Test Pitch Report : सेंच्युरियनमध्ये कोण बाजी मारणार? काय सांगते आजवरची आकडेवारी

याबाबत पेटीएमने सांगितले की, कंपनीतील ऑपरेशन्स आणि मार्केटींग विभागातील कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आले आहे. ही कर्मचारी कपात ऑक्टोबर महिन्यापासून सुरू झाली आहे. कारण कंपनीला आता हे विभाग कर्मचाऱ्यांकडून नाही तर एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने चालवायचे आहेत. ज्यामुळे कामातीस रिपीटेशन आणि अनावश्यक खर्च वाचणार आहे.

Aishwarya Sharma: एक्स बॉयफ्रेंडवर भडकली ऐश्वर्या शर्मा.. म्हणाली ‘लाज वाटली पाहिजे तुला..’

तसेच पेटीएमच्या प्रवक्त्याकडूव असं देखील सांगण्यात आलं आहे की, या कर्मचारी कपातीमुळे कंपनीचा 10 ते 15 टक्के खर्च वाचणार आहे. तसेच एआय एका कर्मचाऱ्याच्या तुलनेत जास्त प्रभावी काम करतं. एक कर्मचारी देऊ शकत नाही. त्यापेक्षा जास्त कौशल्य एआयकडून कंपनीला अनपेक्षितपणे मिळणार आहेत. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून कामाच्याबाबतीत कुचराई करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे निरीक्षण करण्यात आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

दुसरीकडे पेटीएम ही कंपनी त्यांच्या नवनवीन व्यवसायाचा विस्तार करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे ते आगामी वर्षात तब्बल 15 हजार कर्मयऱ्यांची नियुक्ती करणार आहे. त्यामध्ये भारतात देखील हा व्यवसाय वाढवला जाणार आहे. त्यामुळे कंपनी एकीकडे कामामध्ये पारंगत नसलेल्या आणि कुचराई करणाऱ्या कर्मचाऱ्यांची हकालपट्टी करत आहे. तसेच ती नवनव्या तरूण लोकांना भरती करण्याच्या देखील विचारात आहे. असं ही यावेळी कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितलं आहे.

Tags

follow us