OpenAI मध्ये मोठी उलथापालथ; एका रात्रीत दोन संस्थापक कंपनीतून बाहेर : मिरा मुरातींच्या खांद्यावर धुरा

OpenAI मध्ये मोठी उलथापालथ; एका रात्रीत दोन संस्थापक कंपनीतून बाहेर : मिरा मुरातींच्या खांद्यावर धुरा

ChatGPIT : ChatGPIT चे निर्माते OpenAI कडून एक मोठी बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनीचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम ऑल्टमन (Sam Altman) यांना पदावरून हटवले आहे. ओपनएआयचे अध्यक्ष ग्रेग ब्रॉकमन (Greg Brockman) यांनीही कंपनीच्या या निर्णयाच्या निषेधार्थ आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आता सॅम ऑल्टमन यांच्या जागी कंपनीच्या मुख्य तंत्रज्ञान अधिकारी मीरा मुराती (Mira Muratti) येणार आहेत.

कंपनीने एका ब्लॉगमध्ये खुलासा केला आहे की ओपनएआयच्या बोर्डाला आता ऑल्टमनवर विश्वास राहिलेला नाही. त्यांच्या नेतृत्व क्षमतेवर बोर्डाला विश्वास नव्हता. बोर्ड सदस्य आणि सॅम यांच्यातील संवादाचा अभाव हे त्याचे प्रमुख कारण असल्याचे सांगितले जात आहे.

‘चोकर्स’ म्हणजे काय? दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट टीमला हा टॅग का मिळाला?

दरम्यान मीरा मुराती यांना नुकतेच कंपनीचे अंतरिम सीईओ बनवण्यात आले आहे. कंपनीने म्हटले आहे की ते सीईओ पदासाठी योग्य व्यक्तीच्या शोधात आहेत. ओपनएआयच्या सीईओ बनल्यानंतर मीरा मुराती अचानक प्रसिद्धीच्या झोतात आल्या आहेत.

ऑल्टमन यांनी ट्विट केले
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनीच्या मुख्य तंत्रज्ञान अधिकारी मीरा मुराती आता अंतरिम सीईओ म्हणून कार्यभार स्वीकारतील. काढून टाकल्यानंतर ऑल्टमनने ट्विट केले की, “मला ओपनएआयमधील माझा वेळ खूप आवडला. कंपनीत प्रतिभावान लोकांसोबत काम करताना मला सर्वाधिक आनंद झाला. राजीनामा हा परिवर्तनवादी निर्णय होता. आता मी काय करणार आहे, काय होईल ते नंतर सांगेन, असे म्हटले आहे.

PM मोदींच्या उपस्थितीत वर्ल्डकपची ग्रँड फायनल! जोडीला वायुसेनेचा एअर शो अन् प्रीतमचे LIVE Music

कोण आहेत मीरा मुराती?
मीरा मुराती मूळची अल्बेनियन असून तिचे आई-वडील देखील अल्बेनियाचे आहेत. मीराचे शिक्षण कॅनडात झाले असून ती व्यवसायाने मेकॅनिकल इंजिनिअर आहे. डार्टमाउथ कॉलेजमध्ये पदवीच्या शिक्षणादरम्यान मीरा मुरतीने हायब्रीड रेस कार बनवली होती.

मीरा मुरातीने गोल्डमन सॅकमध्ये इंटर्नशिपही केली आहे. मीराने 2018 मध्ये ओपनएआयमधून तिच्या करिअरची सुरुवात केली. याआधी मीराने इलेक्ट्रिक वाहन निर्मिती कंपनी टेस्लामध्ये काम केले आहे आणि कंपनीची मॉडेल एक्स कार विकसित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मीराने टेस्ला येथे वरिष्ठ उत्पादन व्यवस्थापक म्हणून तीन वर्षे काम केले. मीराने लीप मोशन ही संगणकीय प्रणाली विकसित करणाऱ्या स्टार्टअप कंपनीमध्येही काम केले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube