नरेंद्र मोदींनाही डीपफेकचा फटका, युजर्संना दिला महत्त्वाचा सल्ला
Deepfake : टेक्नॉलॉजी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या युगात कोणताही फोटो, व्हिडिओ आणि ऑडिओ सोबत छेडछाड (Deepfake) केली जाऊ शकते. अलीकडेच आर्टिफिशियल इंटेलिजेंस बेस्ड टूल्सचा वापर करून अभिनेत्री रश्मिका मंदन्नाचा (Rashmika Mandanna) डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाला. यानंतर सर्वत्र मोठा गदारोळ निर्माम झाला होता.
नरेंद्र मोदींनी व्यक्त केली चिंता
आता स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी डीपफेकबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली असून डीपफेकमुळे समाजात प्रचंड अशांतता निर्माण होऊ शकते, असे म्हटले आहे. पीएम मोदी म्हणाले की, ओळीच्या बाहेर एक ओळ देखील गोंधळ निर्माण करू शकते. ते म्हणाले की जनरेटिव्ह AI द्वारे तयार केलेला फोटो किंवा व्हिडिओंमध्ये स्पष्ट डिस्क्लेमर असायला हवे की ते डीपफेक वापरून तयार केले गेले आहेत.
सायरस पूनावाला यांना हृदयविकाराचा झटका, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
गरबा व्हिडिओचा केला उल्लेख
पीएम मोदींनी डीपफेक हे भारतीय व्यवस्थेसमोरील सर्वात मोठा धोका असल्याचे वर्णन केले आहे. पीएम मोदी म्हणाले की, डीपफेकमुळे समाजात अराजकता निर्माण होऊ शकते. ते म्हणाले की लोक आणि मीडियाने डीपफेकबद्दल खूप सावध राहण्याची गरज आहे. पीएम म्हणाले, ‘मी माझा एक व्हिडिओ पाहिला ज्यामध्ये मी गरबा करत आहे आणि मी लहानपणापासून गरबा खेळला नसला तरीही तो खूप ओरिजनल दिसत होता.’
एमपी-छत्तीसगडमध्ये विधानसभेसाठी मतदान; भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरस
पंतप्रधानांचा फेक व्हिडिओ व्हायरल झाला
गेल्या महिन्यात पीएम मोदींचा गरबा डान्सचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये पंतप्रधानांसारखी दिसणारी व्यक्ती काही महिलांसोबत गरबा करताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नवरात्रीत गरबा खेळतानाचा हा व्हिडिओ असल्याचे बोलले जात आहे. या दाव्याचा हा व्हिडिओ फेसबुक आणि ट्विटरवर चांगलाच व्हायरल होत आहे.