PM मोदींच्या उपस्थितीत वर्ल्डकपची ग्रँड फायनल! जोडीला वायुसेनेचा एअर शो अन् प्रीतमचे LIVE Music
गांधीनगर : अहमदाबाद येथे होत असलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील ICC मेन्स वर्ल्डकप फायनलसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान रिचर्ड मार्ल्स उपस्थित राहणार आहेत. याशिवाय भारतातील इतर राज्यांतील मुख्यमंत्रीही या सामन्याला उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती स्वतः गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांनी दिली. (Prime Minister Narendra Modi and Australian deputy PM Richard Marles will attend the final of the ICC Men’s World Cup 2023)
मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी संध्याकाळी गांधीनगरमध्ये सामन्या दरम्यानची सुरक्षा, वाहतूक व्यवस्थापन आणि स्वच्छता या बाबींचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली. यावेळी राज्याच्या गृहमंत्रालयाने आणि सुरक्षा यंत्रणांनी शहरात केलेल्या सुरक्षा व्यवस्थेची माहिती दिली. अहमदाबादचे पोलिस आयुक्त जी एस मलिक यांनी बैठकीत सांगितले की, शहरात 4,500 पोलिस कर्मचारी तैनात केले जातील आणि विशेष पोलिस पथके दोन्ही क्रिकेट संघांना स्टेडियममध्ये आणि त्यांच्या हॉटेलमध्ये परत आणतील.
नेहरूंच्या एका निर्णयाने बीसीसीआय वाचली, भारतीय क्रिकेटचा रंजक प्रवास
प्रेक्षक आणि व्हीआयपींना स्टेडियममध्ये त्रासमुक्त प्रवेश मिळावा आणि सुरळीत वाहतूक व्यवस्थापनासाठी आवश्यक वाहतूक वळवण्यात यावी, असे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले. तसेच प्रेक्षकांच्या सुविधेसाठी पोरविवारी मेट्रो, बीआरटीएस आणि एएमटीएस सेवा वाढविण्याचे निर्देशही देण्यात आले.
दरम्यान, या सामन्यापूर्वी गायक प्रीतम आणि आदित्य गढवी हे स्टेडियममध्ये परफॉर्म करतील. तसेच सामना सुरू होण्यापूर्वी आणि डावाच्या विश्रांतीदरम्यान भारतीय वायुसेनेची (IAF) सूर्यकिरण एरोबॅटिक टीम दुपारी सामना सुरू होण्यापूर्वी आणि डावाच्या विश्रांतीदरम्यान स्टेडियमच्या वर एअर शो करणार आहे.
India Vs Australia: भारत-ऑस्ट्रेलिया वर्ल्डकप कोण जिंकणार? थलायवाने केली भविष्यवाणी
फायनलआधीच अहमदाबादेत पैशांचा ‘खेळ?
अहमदाबादमधील बहुप्रतिक्षित सामन्याला मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे शहरातील हॉटेल्स फुल्ल झाली आहेत. हॉटेल्सचे दरही गगनाला भिडले आहेत. सामन्याची तिकीटं मिळणंही सोपं राहिलेलं नाही. मोठ्या मुश्किलीनं तिकीटं मिळतात. त्यात पुन्हा या कृत्रिम महागाईचाही फटका चाहत्यांना बसत आहे. एरव्ही 500 ते 700 रुपये प्रति दिवस भाडं असणाऱ्या हॉटेल्सचे दर तब्बल दहा हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. तर लक्झरी हॉटेल्समध्ये एक दिवसाच्या मुक्कामाचे तब्बल 1 लाख रुपये घेतले जात आहेत. गर्दी वाढल्याने प्रवासाचे दरही वाढले आहेत. दिल्ली ते अहमदाबाद विमान तिकीटाची किंमत 15 हजार रुपयांपर्यंत पोहोचली आहे. तसेच मुंबई अहमदाबाद प्रवासाचेही दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.