नेहरूंच्या एका निर्णयाने बीसीसीआय वाचली, भारतीय क्रिकेटचा रंजक प्रवास
World Cup 2023 : क्रिकेट विश्वात आज भारत सुपरपावर आहे. जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड भारताचे आहे. विश्वचषक 2023 मध्ये (World Cup 2023) भारतीय टीम ही सर्वात बलाढ्य टीमपैकी एक मानली जाते. एखाद्या सणाप्रमाणे भारतात क्रिकेट (Indian Cricket) साजरा केला जातो. परंतु भारतीय क्रिकेटचा आजपर्यंतचा प्रवास खूप रंजक आणि रोमांचक राहिला आहे.
1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतीय क्रिकेटसमोर आयसीसीचे सदस्यत्व गमावण्याचा धोका निर्माण झाला होता. त्यावेळी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या एका निर्णयामुळे भारताचे सदस्यत्व अबाधित राहू शकले.
त्यावेळी जागतिक क्रिकेट संस्था ICC ला इंपीरियल क्रिकेट कॉन्फरन्स म्हणून ओळखले जात होते आणि ब्रिटिश राजेशाहीचा आश्रय होता. परंतु आता आयसीसीला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणून ओळखले जाते.
वर्ल्ड कपमध्ये भारत-ऑस्ट्रेलिया किती वेळा भिडले? फायनलमध्ये कोणाचे पारडे जड
राष्ट्रकुलने भारताचे सदस्यत्व वाचवले
कॉमनवेल्थच्या सदस्यत्वाने भारताचे ICC चे सदस्य कायम राहिले. 1947 मध्ये भारताला ब्रिटीश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही नवीन सरकारने प्रजासत्ताक होईपर्यंत म्हणजेच देशात राज्यघटना लागू होईपर्यंत ब्रिटिश राजाचा स्वीकार केला होता.
त्याच वेळी, काँग्रेस पक्षाची इच्छा होती की भारताने प्रजासत्ताक व्हावे आणि ब्रिटिश राजेशाहीशी असलेले सर्व संबंध तोडावेत. त्या काळात तत्कालीन ब्रिटनचे पंतप्रधान क्लेमेंट अॅटली आणि विरोधी पक्षनेते विन्स्टन चर्चिल यांनी भारताला कॉमनवेल्थचा भाग बनण्याची ऑफर दिली होती.
India Vs Australia: भारत-ऑस्ट्रेलिया वर्ल्डकप कोण जिंकणार? थलायवाने केली भविष्यवाणी
सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासह वरिष्ठ काँग्रेस नेत्यांनी भारताला राष्ट्रकुलचा भाग बनण्याच्या कल्पनेला विरोध केला होता. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ब्रिटीश राजवटीसोबत कोणतेही राजकीय किंवा घटनात्मक संबंध ठेवू नयेत असा त्यांचा आग्रह होता.
कॉमनवेल्थमध्ये राहण्याचे स्विकारले
त्यांच्या ‘नाईन वेव्हज: द एक्स्ट्राऑर्डिनरी स्टोरी ऑफ इंडियन क्रिकेट’ या पुस्तकात ब्रिटिश-भारतीय पत्रकार मिहिर बोस लिहितात की चर्चिल यांनी सुचवले की भारत प्रजासत्ताक झाला तरी राष्ट्रकुलमध्ये प्रजासत्ताक राहू शकतो आणि राजेशाही स्वीकारू शकतो. ब्रिटिश राजालाही ही कल्पना आवडली. नेहरूंनी भारताला कॉमनवेल्थमध्ये ठेवण्याचे मान्य केले.
अशा प्रकारे भारत बनला आयसीसीचा स्थायी सदस्य
मिहिर बोस यांनी पुस्तकात लिहिले आहे की 19 जुलै 1948 रोजी लॉर्ड्स येथे जेव्हा इम्पीरियल क्रिकेट कॉन्फरन्स (ICC) ची बैठक झाली. त्या बैठकीत भारताला आयसीसीचे सदस्यत्व देण्याचा निर्णय घेण्यात आला परंतु केवळ तात्पुरत्या स्वरुपात सदस्य होते. भारताच्या ICC सदस्यत्वात दोन वर्षांनी पुन्हा सुधारणा करण्यात येणार होती. ICC च्या नियम 5 मध्ये असे म्हटले आहे की जर एखादा देश ब्रिटीश कॉमनवेल्थचा सदस्य नसेल तर त्याचे सदस्यत्व रद्द होईल.
World Cup Final : एक दिवसाचं भाडं एक लाख; फायनलआधीच अहमदाबादेत पैशांचा ‘खेळ’!
जून 1950 मध्ये आयसीसीची पुढील बैठक झाली तोपर्यंत, भारताने स्वतःची राज्यघटना स्वीकारली होती परंतु ब्रिटीश राजेशाहीचा सरकारवर कोणताही अधिकार न ठेवता देश कॉमनवेल्थचा सदस्य राहिला. शेवटी, भारताच्या राष्ट्रकुल सदस्यत्वाचा विचार करून, आयसीसीने भारताला स्थायी सदस्य बनवले.