AI Out Of Humans Control Petition For US Govt To Help : कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI विकसित करण्यासाठी जगभरात स्पर्धा सुरू असताना, आता त्याच क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांनी धोक्याचा इशारा दिला आहे. AI इतक्या वेगाने विकसित होत आहे की, भविष्यात त्यावर मानवी नियंत्रण ठेवणे कठीण होऊ शकते, अशी भीती व्यक्त करत 11 हजारांहून अधिक AI तज्ज्ञ, संशोधक आणि कर्मचाऱ्यांनी अमेरिकन सरकारकडे हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. सर्वात प्रगत AI मॉडेल्सचा विकास आणि प्रसार नियंत्रित करण्यासाठी स्पष्ट नियमावली तयार करावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या याचिकेवर AI क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी Anthropic चे CEO डारिओ अमोडेई यांच्यासह OpenAI, Google DeepMind आणि Meta AI मधील अनेक वरिष्ठ संशोधकांनी स्वाक्षरी केली आहे. याबाबत NDTV हिंदी वृत्त प्रकाशित केले आहे.
रील्सपासून ‘रिअल रिटर्न’कडे! Gen-Z शेअर बाजाराचे नवे बॉस, 40% हिस्सा तरूणांकडे
AI तज्ज्ञांना नेमकी कशाची भीती आहे?
पेसिंग द फ्रंटियर’ नावाच्या या याचिकेत, अमेरिकन सरकारला इतर देशांसोबत मिळून अशी तंत्रज्ञानं आणि नियम विकसित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे, जे सर्वात प्रगत एआयच्या विकासाच्या गतीवर विचारपूर्वक नियंत्रण ठेवतील. ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी या याचिकेवर स्वाक्षरी केली नसली तरी, मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या एका मुलाखतीत ते म्हणाले की, समाजाला जुळवून घेण्यासाठी वेळ मिळावा म्हणून एआय कंपन्यांना स्वेच्छेने एआय विकासाची गती कमी करावी लागू शकते.
तज्ज्ञांच्या मते, AI ची क्षमता झपाट्याने वाढत आहे. भविष्यात AI स्वतःच अधिक प्रगत AI प्रणाली तयार करू लागला, तर त्याचा वेग आणि परिणाम यांचा अंदाज बांधणे अवघड होईल. याचिकेत स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, AI ची ताकद जर मानवी नियंत्रण आणि समजुतीपेक्षा अधिक वेगाने वाढली, तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे विकासाचा वेग कमी करत सुरक्षिततेला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.
इमोश्नल सपोर्ट देण्यात AI चॅटबॉटने माणसांनाही टाकलं मागे; समोर आलेल्या स्टडीने सगळेच चक्रावले
OpenAI च्या चाचणीत काय घडलं?
या चर्चेला आणखी गंभीर बनवणारी घटना अलीकडेच OpenAI च्या अंतर्गत चाचण्यांमध्ये समोर आली. कंपनीने सांगितले की, चाचणीदरम्यान त्यांच्या दोन AI मॉडेल्सनी ठरवून दिलेल्या सुरक्षा मर्यादा ओलांडल्या. त्यांनी इंटरनेटशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आणि Hugging Face या डेव्हलपर्ससाठीच्या लोकप्रिय प्लॅटफॉर्मवर प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याचे कंपनीने म्हटले आहे. या घटनेनंतर OpenAI ने काही काळ चाचण्या थांबवल्या आणि आपल्या ‘सँडबॉक्सिंग’ सुरक्षाव्यवस्थेत सुधारणा केल्या. सँडबॉक्सिंग म्हणजे AI किंवा कोडला मर्यादित आणि सुरक्षित वातावरणात ठेवून त्याची चाचणी करण्याची पद्धत होय. सँडबॉक्सिंग ही एक अशी पद्धत आहे, ज्यामध्ये कोड एका मर्यादित आणि सुरक्षित वातावरणात चालवून त्याची चाचणी केली जाते. सॅम ऑल्टमन म्हणाले की, दीर्घकाळात एआय उद्योगाला एआय विकासाचा वेग कमी करण्यावर एकत्रितपणे सहमत व्हावे लागेल.
आपण सिंग्युलॅरिटीवर पोहोचलो आहोत – सॅम ऑल्टमन
OpenAI चे CEO सॅम ऑल्टमन यांनी या याचिकेवर स्वाक्षरी केली नसली, तरी त्यांनीही AI विकासाचा वेग कमी करण्याची गरज मान्य केली आहे. शनिवारी प्रसिद्ध झालेल्या ‘रिलेन्टलेस’ नावाच्या दुसऱ्या पॉडकास्टमध्ये सॅम ऑल्टमन म्हणाले की, सिंग्युलॅरिटीचे युग आता सुरू झाले आहे. सिंग्युलॅरिटी ही एक काल्पनिक परिस्थिती मानली जाते, जेव्हा तंत्रज्ञान मानवी बुद्धिमत्ता आणि नियंत्रणाच्या पलीकडे जाते. AI च्या अधिक शक्तिशाली क्षमतांशी जुळवून घेण्यासाठी समाजाला वेळ मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे AI कंपन्यांनी काही काळ स्वेच्छेने विकासाचा वेग कमी करण्याचा विचार करायला हवा. त्यांनी हेही स्पष्ट केले की, अशा नियमांमुळे मोठ्या कंपन्या स्पर्धा रोखत आहेत, असा गैरसमज होणार नाही, याची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. तंत्रज्ञान मानवी बुद्धिमत्ता आणि नियंत्रणाच्या पलीकडे जाण्याच्या संभाव्य टप्प्याला ‘सिंग्युलॅरिटी’ असे म्हटले जाते. ऑल्टमन यांच्या मते, AI च्या विकासाचा वेग पाहता ही अवस्था आता दूर राहिलेली नाही.
मुलांनी Meta AI ला सांगितली आत्मXXची गोष्ट, तर आई-वडिलांना लगेच मिळणार Alert…
Anthropic आणि OpenAI वर तात्पुरती बंदी
यंदाच्या सुरुवातीला अमेरिकन सरकारने राष्ट्रीय सुरक्षेचा हवाला देत Anthropic आणि OpenAI यांच्या काही अत्याधुनिक AI मॉडेल्सच्या प्रकाशनावर तात्पुरती बंदी घातली होती. दोन्ही कंपन्यांनी या आदेशाचे पालन केले. नंतर काही अटींसह ही बंदी उठवण्यात आली. आजवर AI क्षेत्रात अधिक शक्तिशाली आणि अधिक वेगवान मॉडेल्स विकसित करण्याची स्पर्धा होती. मात्र आता हीच शर्यत धोकादायक ठरू शकते, अशी चिंता AI तयार करणाऱ्या कंपन्यांनीच व्यक्त केली आहे. यामुळे ‘AI किती वेगाने विकसित व्हावा?’ हा प्रश्न आता तांत्रिक न राहता जागतिक धोरण, राष्ट्रीय सुरक्षा आणि मानवी भवितव्याशी जोडलेला मुद्दा बनला आहे. त्यामुळे येत्या काळात AI च्या विकासाचा वेग आणि त्यावरील नियंत्रण यावर जगभरात मोठी चर्चा होण्याची शक्यता आहे.
