Download App

Air India च्या फ्लाईटमध्ये तुम्ही पण जेवण मागवताय? तर सावधान…मिलमध्ये आढळलं धारदार ‘ब्लेड’

एअर इंडिया कंपनीचे AI175 हे विमानबंगळुरूहून सॅन फ्रान्सिस्कोला निघाले होते. त्यावेळी एका प्रवाशाने खाण्यासाठी काही पदार्थ मागवलो होते.

  • Written By: Last Updated:

नवी दिल्ली : नुकतंच मुंबईत एका व्यक्तीने मागवलेल्या आईस्क्रिमध्ये मानवी बोट आढळून आल्याचा किळसवाणा प्रकार समोर आला होता. त्याची चौकशी सुरू असतानाच आता एअर इंडियाच्या विमानात प्रवाशाने मागवलेल्या मिलमध्ये ब्लेड आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे जर तुम्हीपण विमान प्रवासादरम्यान मिल मागवत असाल तर सावधान होण्याची गरज आहे. या घडलेल्या प्रकारानंतर एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांना स्पष्टीकरण दिले आहे. (Sharp Metal Blade Found In Air India Meal)

नेमकं काय घडलं?

एअर इंडिया कंपनीचे AI175 हे विमानबंगळुरूहून सॅन फ्रान्सिस्कोला निघाले होते. त्यावेळी एका प्रवाशाने खाण्यासाठी काही पदार्थ मागवलो होते. त्यातील एका पदार्थामध्ये धारदार ब्लेड आढळून आल्याचे Mathures Paul या प्रवाशाने X वर पोस्ट करत सांगितले आहे. हा ब्लेडचा तुकडा एखाद्या लहान मुलाच्या जेवणात आला असता तर? असा प्रश्नही Mathures Paul यांनी उपस्थित केला आहे. यातत त्यांनी फ्लाईटमध्ये मागवलेले जेवण आणि दुसऱ्या फोटो त्यात आढळून आलेले ब्लेड दाखवले आहे.

पाठ्यपुस्तकांमध्ये ‘भारत’ अन् ‘इंडिया’ दोन्ही वापरणार; राज्यघटनेचा संदर्भ देत सकलानी यांचं मोठं विधान

पॉल पुढे पोस्टमध्ये म्हणतात की, एअर इंडियाच्या विमानात मी जेवण मागवले. ते आल्यानंतर मी ते खाण्यास सुरूवा केली. पण काही घास खाल्यानंतर मला तोंडात काहीतरी कडक असल्याचे जाणवले. मी तात्काळ घास तोडातून बाहेर काढला. त्यावेळी मला जेवणामध्ये ब्लेडसारखी दिसणारी गोष्ट आढळली. हे खूप धक्कादायक असून, या सगळ्यासाठी अर्थातच एअर इंडियासाठी केटरिंग सेवा पुरवणारी कंपनी दोषी आहे. पण यामुळे माझ्या मनातील एअर इंडियाची छबी आणखीनच वाईट झाल्याचे पॉल यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

एअर इंडियाचं स्पष्टीकरण काय?

आमच्या एका फ्लाइटमधील प्रवाशाने मागवलेल्या जेवणात मेटल ब्लेड आढळून आल्याची पुष्टी करण्यात आल्याचे एअर इंडियाचे ग्राहक सेवा विभागाचे प्रमुख अधिकारी राजेश डोगरा यांनी सांगितले. आमच्या केटरिंग पार्टनरकडून वापरण्यात येणाऱ्या प्रोसेसिंग मशीनमधून हे ब्लेड जेवणात आल्याचे डोगरा यांनी म्हटले आहे. तसेच यापुढे अशा प्रकारची धारदार गोष्टी येऊ नये हे टाळण्यासाठी विशेष काळजी घेण्याच्या सूचना केटरिंग पार्टनरला देण्यात आल्या आहेत असे डोगरा यांनी स्पष्ट केले.

follow us

वेब स्टोरीज