LetsUpp l Govt. Schemes
राज्यातील (Maharashtra)ग्रामीण भागात स्वयंरोजगारास चालना (Promotion of self-employment)देण्यासाठी सर्वसाधारण/अनुसूचित जाती /आदिवासी जमाती (Scheduled Castes/Tribal Tribes)या संवर्गातील व्यक्तींना वैयक्तिक लाभाची योजना (Personal Benefit Plan)शासनाकडून सुरु करण्यात आली आहे.
योजनेसाठी अटी :
– शेळी / मेंढी गटाची (उस्मानाबादी /संगमनेरी /माडग्याळ / अन्य स्थानिक प्रजातीच्या) खरेदी पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या शेळया-मेंढयांच्या मान्यताप्राप्त बाजारातून करावी. शासनाने निश्चित आराखडयाप्रमाणे वाडा उभारणे आवश्यक.
– शेळयांचा गट पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांना पाठपुरावा / योजना मूल्यांकनासाठी आवश्यक त्या वेळी उपलब्ध करून देणे.
शेळयांचा गट 3 वर्षे सांभाळणे बंधनकारक आहे.
– शेळयांचा गट मृत पावल्यास पशुवैद्यकिय दवाखान्यास सांगून मृत जनांवराचे शवविच्छेदन करून घेणे व मिळणाऱ्या विमा रकमेतून शेळी खरेदी करणे बंधनकारक आहे.
– अर्जदार पती / पत्नीपैकी कोणीही शासकीय / निमशासकीय / सेवानिवृत्त, पदाधिकारी नसावेत.
– शेळी गट वाटप योजनेचा लाभ यापूर्वी मिळालेला नसावा.
शकुनीमामाचं मिशन फत्ते! पवारांची भाकरी, सामनात पेढे; राणेंची राऊतांवर टीका
लाभाचे स्वरूप : 10 शेळया / मेंढया व 1 बोकड / नर मेंढा (उस्मानाबाद / संगमनेरी जातीच्या) शेळी गट प्रकल्पाची किंमत- रु.87857/- आणि (स्थानिक जातीच्या) गट प्रकल्पाची किंमत- रु.64886/-
सर्वसाधारण प्रवर्गासाठी प्रकल्प किंमतीच्या 50 % अनुदान आणि अनुसूचित जाती /आदिवासी जमातीस प्रकल्पाच्या 75 % अनुदान देय राहील.
आवश्यक कागदपत्रे :
– फोटो ओळखपत्राची सत्यप्रत
– दारिद्र्ययरेषेखाली असल्याचा दाखला
– 7/12 व 8-अ उतारा आणि ग्रामपंचायत नमुना नं. 8
– प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित सत्यप्रत
– जातीच्या दाखल्याची सत्यप्रत
– बचत गट सदस्य असल्यास प्रमाणपत्र
– रोजगार-स्वयंरोजगार कार्यालयाचे नांव नोंदणी कार्डाची सत्यप्रत.
– अपत्य दाखला (ग्रामपंचायत यांचा)
संपर्क कार्यालयाचे नाव :
– पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती
– जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद
– जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त