राहू कुंभमध्ये शनी मीन राशीमध्ये! बाराही राशींवर काय परिणाम होणार जाणून घ्या…

zodiac signs वर आज आठ नोव्हेंबर 2025 रोजीच्या ग्रहांच्या स्थितीचा काय परिणाम होतो जाणून घेऊ सविस्तर

zodiac signs

Rahu in Aquarius, Saturn in Pisces! Know what will be the impact on all twelve zodiac signs : आज आठ नोव्हेंबर 2025 रोजी ग्रहांची स्थिती अशी आहे की, चंद्र वृषभ राशिमध्ये गुरु कर्क राशिमध्ये केतू सिंह राशि मध्ये सूर्य आणि शुक्र तूळ राशीमध्ये बुध आणि मंगळ वृश्चिक राशीमध्ये राहू कुंभ राशीमध्ये शनी मीन राशीमध्ये भ्रमण करत आहे. याचा परिणाम बाराही राशींवर काय होतो जाणून घेऊ सविस्तर

मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची जीभ घसरली! शेतकरी कर्जमाफीबद्दल केलं वादग्रस्त वक्तव्य

मेष- या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस पराक्रमी आणि व्यवसायामध्ये यश मिळवणारा असणार आहे. योग्य अर्थार्जन होऊन तुमच्या संपत्तीमध्ये वृद्धी होईल. आरोग्य चांगलं राहील. प्रेम आणि संतती संबंधित स्थिती चांगली असेल. व्यापारी दृष्टिकोनही चांगला असेल.

ऋषभ- या राशीच्या लोकांनी आजच्या दिवशी त्यांच्या जिभेवर नियंत्रण ठेवण्यात अत्यंत गरजेचे आहे. कुठेही गुंतवणूक आजच्या दिवशी करणे धोक्याचे ठरू शकते. मात्र आरोग्याची स्थिती चांगलं राहून प्रेम आणि संततीची साथ मिळेल.

कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंकडून शेतकरी कर्जमाफीला दुजोरा; कर्मवीर कृषी महोत्सव 2025 चे शानदार उद्घाटन

मिथुन- या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सकारात्मक ऊर्जा निर्माण करणार आहे. तुमचा आरोग्य ही पहिल्यापेक्षा सुधारेल प्रेम आणि संतांची स्थिती अत्यंत चांगली राहून व्यापारामध्ये भरभराट होईल.

कर्क- या राशीच्या लोकांसाठी आजच्या दिवशी काही आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. प्रेम आणि संतती बाबतची स्थिती चांगले राहील. व्यापारी दृष्टिकोन देखील चांगला राहील.

माझ्या पतीला आठ दिवसांपासून रोज दारू पाजली अन्…, जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट प्रकरणातील आरोपीची पत्नी समोर

सिंह- या राशीचे लोकांसाठी आजच्या दिवशी नवीन उत्पन्नाची साधने निर्माण होतील. तसेच जुन्या काही उत्पन्नाच्या स्त्रोतांपासून इन्कम मिळेल. काही प्रवासाचे योग निर्माण होतील. त्यामुळे मन प्रसन्न राहून प्रेम आणि संतती संबंधित चांगली स्थिती राहील.

कन्या -या राशीच्या लोकांना आज व्यापारामध्ये यश मिळेल. तसेच कोर्ट कचेरीच्या प्रकरणांमध्ये ही विजय मिळेल. राजकीय लोकांना देखील आजचा दिवस चांगला असून आरोग्यबाबत अत्यंत उत्तम दिवस आहे.

काय सांगता ? एअर ट्रॅफिक स्वॉफ्टवेअरमध्ये बिघाड, तीनशेहून अधिक विमानांचे उड्डाणे रखडले

तूळ- या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सायंकाळनंतर अनुकूल राहील. आरोग्यामध्ये सुधारणा होऊन प्रेम आणि संततीची साथ मिळेल.

वृश्चिक- या राशीच्या लोकांनी आजच्या दिवशी काहीसं सावध वागणं गरजेचं आहे. आरोग्यावर लक्ष द्या. वाहन चालवताना काळजी घ्या. तर प्रेम आणि संतती बाबतची स्थिती अत्यंत चांगली असेल.

महेंद्र सिंह धोनीच्या आयपीएल 2026 खेळणार का?, सीएसके सीईओंनी केली मोठी घोषणा

धनु- या राशीच्या लोकांना आजच्या दिवशी त्यांच्या पार्टनर करून सहवास मिळेल. नोकरी-चाकरीमध्ये चांगली स्थिती राहील. आरोग्यामध्ये सुधारणा होईल. प्रेम आणि संततीची साथ मिळेल.

मकर- या राशीच्या लोकांचा आजच्या दिवशी त्यांच्या विरोधकांवरील धबधबा कायम राहील. मात्र आरोग्य बाबत काहीशी स्थिती चिंताजनक असेल. प्रेम आणि संतती बाबतची स्थिती उत्तम असेल.

मनीष मल्होत्राच्या ‘गुस्ताख इश्क’ च्या सुपरहीट भावपूर्ण एल्बमनंतर ‘कुछ पहले जैसै’ ची जादू!

कुंभ- या राशीच्या लोकांना आजचा दिवस काहीसा भावनेने निर्णय घेणे धोक्याचे ठरू शकते. प्रेमामध्ये काही वादविवाद निर्माण होऊ शकतो. त्यापासून सावध रहा तसेच मुलांच्या आरोग्यावर लक्ष द्या.

मीन- या राशीच्या लोकांसाठी आजच्या दिवशी काही गृह क्लेश निर्माण होऊ शकतात. मात्र भौतिक सुख संपत्तीमध्ये वृद्धी होत प्रेम आणि संततीची स्थिती चांगली असेल.

follow us