काय सांगता ? एअर ट्रॅफिक स्वॉफ्टवेअरमध्ये बिघाड, तीनशेहून अधिक विमानांचे उड्डाणे रखडले

Delhi airport: सिस्टीममधील तांत्रिक बिघाडामुळे तीनशेहून अधिक उड्डाणे रखडली होती. हळूहळू ही सेवा सुरुळीत सुरू झाली

  • Written By: Published:
300 flights being delayed due to a technical glitch in the air traffic control

300 flights being delayed due to a technical glitch in the air traffic control: दिल्ली विमानतळावर (Delhi airport) मोठा गोंधळ उडाला. कारण एअर ट्रॅफिक कंट्रोल (air traffic control) सिस्टीममधील तांत्रिक बिघाडामुळे तीनशेहून अधिक उड्डाणे रखडली होती. हळूहळू ही सेवा सुरुळीत सुरू झाली असली तरी प्रवाशांची मात्र मोठी अडचण निर्माण झाली होती. याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या होत्या. स्वॉफ्टवेअरवर सायबर अॅटक झाल्यामुळे एअर ट्रॅफिक कंट्रोल बंद पडल्याची चर्चा सुरू झाली होती. परंतु तसे काही झालेले नाही. तांत्रिक अडचणीमुळे सिस्टिम बंद पडल्याने हे झाल्याचे विमानतळ प्रशासनाकडून (Airports Authority of India) जाहीर करण्यात आले.


मुंढवा जमीन घोटाळ्यातील मोठी बातमी! सर्व व्यवहार रद्द, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

एअर ट्रॅफिक कंट्रोल डेटाला समर्थन देणाऱ्या ऑटोमॅटिक मेसेज स्विचिंग सिस्टम (एएमएसएस) मधील तांत्रिक समस्येमुळे हे व्यत्यय येत होता, असे एअर एअरपोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया (एएआय) जाहीर केलंय. आता मॅन्युअली फ्लाइट प्लॅनवर विमाने सोडली जात आहे. ज्यामुळे काही विलंब होत आहेत. तांत्रिक पथके लवकरात लवकर सिस्टम पुनर्संचयित करण्यासाठी काम करत आहेत, असे एएआयने जाहीर केलंय.

छत्रपती संभाजीनगरकरांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षात मिळणार २४ तास घरोघरी पाणी

विमानांच्या विलंबामुळे विमानतळावर आणि विमानांमध्ये विलंब होत आहे. प्रतीक्षा वेळ जास्त आहे, असे एअर इंडियाने एका पोस्टमध्ये म्हटले आहे. दिल्लीतील एटीसी सिस्टीममधील तांत्रिक समस्येमुळे सर्व विमान कंपन्यांच्या उड्डाणांवर परिणाम झाला आहे. ज्यामुळे विमानतळावर आणि विमानांमध्ये विलंब आणि प्रतीक्षा वेळ जास्त होत आहे. या अनपेक्षित व्यत्ययामुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल आम्हाला खेद आहे, जो आमच्या नियंत्रणाबाहेर असल्याचे विमानतळ प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. (300 flights being delayed due to a technical glitch in the air traffic control)


आयटी इंजिनिअरला 14 कोटींना गंडविले ! वेदिका पंढरपूरकरसह तिघे पुणे पोलिसांना सापडले

स्पाइसजेट आणि इंडिगो विमानसेवा कंपन्यांनी म्हटलंय की, या व्यत्ययामुळे दिल्ली आणि अनेक उत्तरेकडील प्रदेशांमधील उड्डाणे प्रभावित झाली आहेत. काल संध्याकाळपासून ही समस्या उद्भवली आहेत. ती शुक्रवार सायंकाळपर्यंत सुटलेली नाही.


दिल्ली विमानतळ सर्वात व्यस्त विमानतळ

दिल्लीतील इंदिरा गांधी विमानतळ हे देशातील सर्वात व्यस्त विमानतळ आहे. येथून दररोज सुमारे 1550 उड्डाणे हाताळली जात आहेत. गेल्या आठवड्यात संशयास्पद जीपीएस स्पूफिंगच्या घटनांमुळे विमान नेव्हिगेशन सिस्टममध्ये व्यत्यय आला आणि अनेक उड्डाणे वळवावी लागली. यामुळे अनपेक्षित हवाई वाहतूक कोंडी झाली होती.

follow us