Delhi Airport: दिल्ली विमानतळावर अपघात; छत कोसळल्याने सहाजण जखमी, वाहनांचं नुकसान

Delhi Airport: दिल्ली विमानतळावर अपघात; छत कोसळल्याने सहाजण जखमी, वाहनांचं नुकसान

Accident on Delhi Airport : दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल-1 वर छत कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. आज सकाळी टर्मिनल १ वर विमानतळाचं छत एका वाहनावर पडलं. (Accident ) या अपघातात 6 जण जखमी झाले आहेत. (Delhi Airport) माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि बचावकार्य सुरू केलय. दिल्ली अग्निशमन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार यातली सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

३ गाड्या घटनास्थळी पाठवल्या

या घटनेविषयी बोलताना दिल्ली फायर सर्व्हिसेसच्या अधिकाऱ्यानं सांगितलं की, दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल-1 वर छत कोसळल्याची घटना घडली. अग्निशमन दलाच्या ३ गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या आहेत. या अपघातानंतर सुरुवातीला चारजण जखमी झाल्याचे वृत्त आहे. आता जखमींची संख्या 6 झाली आहे.

Beed News : मराठा विरूद्ध ओबीसी वाद चिघळळा; मनोज जरांगे पाटलांच्या मूळगावी दगडफेक

ड्रायव्हर थोडक्यात बचावले

असाच एक अपघात जबलपूरच्या विमानतळावर झाला आहे. 450 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या डुमना विमानतळावर गुरुवारी (27 जून) टर्मिनल बिल्डिंगच्या ड्रॉप अँड गो एरियातील तणावपूर्ण छत फुटल्याने पाण्याचा पूर आला आणि एका कारचा चक्काचूर झाला. या घटनेत आयकर विभागाचा एक अधिकारी आणि त्याचा ड्रायव्हर थोडक्यात बचावले.

पाहाटेपासून जोरदार पाऊस आज राज्यात कोसळधार! पुण्यासह कोकण, मराठवाडा, विदर्भातील या जिल्ह्यांना यलो अलर्ट

दिल्लीत आज मान्सूनचा पहिला जोरदार पाऊस झाला. पहाटे साडेचार ते पाच वाजेपर्यंत मुसळधार पावसाने दिल्ली भिजली. मात्र, त्यामुळे सकाळपासूनच शहरात पाणी साचल्याने वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली. अनेक ठिकाणी लांबच लांब ट्रॅफिक जाम असून लोकांना तिथे पोहोचण्यासाठी दोन तासांपेक्षा जास्त वेळ लागत आहे.

 

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube