Porsche Accident : खटला फास्ट ट्रॅक चालण्याचा प्रयत्न करणार, CM शिंदेंचे मृत मुलांच्या पालकांना आश्वासन
Pune Porsche hit and run case : पुणे पोर्शे हिट अँड रन प्रकरणात (Pune Porsche hit and run case) मृत्यूमुखी पडलेला तरुण अनिश अवधियाचे (Anish Awdhiya) वडील ओमप्रकाश अवधिया आणि तरुणी अश्विनी कोष्टाचे वडील सुरेश कोष्टा यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची वर्षा निवासस्थानी येऊन भेट घेतली. यावेळी दोषींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी यासाठी हा खटला फास्ट ट्रॅक (Fast track) चालवण्याच्या प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन सीएम शिंदेंनी दिलं.
IND vs AUS: रोहित शर्माची तुफानी खेळी; भारताचे ऑस्ट्रेलियाला दोनशेहून अधिक धावांचे ‘टार्गेट’
काही दिवसांपूर्वी पुण्यातील कल्याणीनगरमध्ये एका अल्पवयीन तरुणाच्या पोर्शे कारने दोघांना चिरडले होते. या भीषण अपघातात अश्विनी कोष्टा आणि अनिस अवधिया यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, आज मृत तरुण-तरुणीच्या आईवडिलांनी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांचे सांत्वन केले. तसेच झालेली घटना दुर्दैवी असून दोषींना कठोरात कठोर शासन केले जाईल असे सांगितले. तसेच झालेल्या या घटनेतील अल्पवयीन आरोपींची सुटका झालेली असताना देखील ही केस नव्याने उघडून त्यात दोषी असलेल्या सर्वांवर कारवाई केली असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केलं. तसेच या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवून दोषींवर लवकरात लवकर शासन व्हावे यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पुण्यात बुलडोझर पॅटर्न! अमली पदार्थमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
पीडित कुटुंबियांनी प्रत्येकी 10 लाख देणार
आईबापाच्या हाताशी आलेली मुलं अचानक गेल्यानं झालेल्या दुःखाची आपल्याला पूर्ण कल्पन आहे. त्यामुळे या दोन्ही मृत मुलांच्या कुटुंबियांना पुन्हा सावरता यावं यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी 10 लाख रुपये देण्याचा निर्णय देखील शिंदे यांनी घेतला आहे.
पुण्यातील या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आणि कुणालाही पाठीशी न घालण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर या प्रकरणाचा वेगाने तपास होऊन अनेक जणांना अटक झाल्याचं या दोघांच्या आईवडिलांनी आणि कुटुंबियांनी मान्य केलं. तसेच आपल्याला भेटून आपलं म्हणणं ऐकून घेतल्याबद्दल आणि आपल्या मुलांसोबत झालेल्या दुर्दैवी घटनेनंतर त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने केलेल्या विशेष प्रयत्नांबद्दल त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे आभार मानले.