Amazon Great Indian Festival Sale : नुकतंच iPhone ची नवीन सिरीज लॉन्च झाल्याने iPhone चे जुने फोन आता कमी दरात मिळत आहे. जर तुम्ही देखील नवीन iPhone खरेदी करण्यचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. ‘ॲमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल 2026 ‘ (Amazon Great Indian Festival Sale 2026) दरम्यान आयफोन अगदी कमी किंमतीमध्ये खरेदीसाठी उपलब्ध झाली आहे. ॲमेझॉनने आयफोन 16 (iPhone 16) साठीही खास डील जाहीर केली आहे. आयफोन 16 मध्ये ॲपल A18 चिपसेट, 48MP कॅमेरा आणि सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले यांसारखी फीचर्स देण्यात आली आहे.
Amazon Great Indian Festival Sale : iPhone 16 तब्बल 18 हजारांनी स्वस्त
ॲमेझॉनने दिलेल्या माहितीनुसार, आयफोन 16 (128 GB व्हेरिएंट) ची MRP 89,990 आहे, तर त्याची सुरुवातीची प्रभावी किंमत (effective price) 71,999 इतकी आहे. म्हणजेच ऑफर्सचा लाभ घेऊन ग्राहक सुमारे 18, 000 पर्यंतची बचत करू शकतात. ॲमेझॉनने बँक सवलती आणि इतर लागू ऑफर्सचा विचार करून ही किंमत निश्चित केली आहे.
SBI आणि Amazon Pay ICICI कार्ड्सवर फायदे
सेलदरम्यान खरेदीदार SBI बँकेच्या क्रेडिट कार्डचा वापर करून अतिरिक्त सवलत मिळवू शकतात. याव्यतिरिक्त, Amazon Pay, ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे केलेल्या खरेदीवर 5% फ्लॅट कॅशबॅकची ऑफर दिली जात आहे. खरेदीदार ‘नो-कॉस्ट ईएमआय’ (No-Cost EMI) पर्याय आणि ‘एक्सचेंज बोनस’ यांसारख्या अतिरिक्त फायद्यांचाही लाभ घेऊ शकतात. मात्र, या ऑफर्ससाठीची पात्रता आणि प्रत्यक्ष होणारी बचत ही ग्राहकाचे कार्ड, एक्सचेंज केला जाणारा डिव्हाइस आणि लागू असलेल्या अटी व शर्तींवर अवलंबून असेल.
आयफोन 16 मध्ये काय खास आहे?
आयफोन 16 मध्ये 6.1 -इंचाचा सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. यात 1179×2556 पिक्सेलचे रिझोल्यूशन आणि 2,000 निट्सपर्यंतची पीक ब्राइटनेस आहे. ॲपलच्या A18 चिपसेटवर चालणारा हा फोन iOS 26 वर कार्यरत आहे. डस्ट आणि पाण्यापासून संरक्षणासाठी या फोनला IP68 रेटिंग मिळाले आहे. कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi 6E, ब्लूटूथ, GPS आणि NFC यांचा समावेश आहे. तसेच, यात USB Type-C पोर्ट देखील देण्यात आला आहे.
48 MP कॅमेरा सेटअप
फोटोग्राफीसाठी, iPhone 16 च्या मागील बाजूस f/1.6 अपर्चर असलेला 48MP चा ‘वाइड’ कॅमेरा देण्यात आला आहे. यासोबत 12MP चा 2x टेलिफोटो कॅमेरा आणि 12MP चा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉल्ससाठी 12MP चा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. या फोनचे वजन अंदाजे 170 ग्रॅम आहे आणि याचे डायमेन्शन्स 147.6 मिमी लांबी, 71.6 मिमी रुंदी आणि 7.8 मिमी जाडी असे आहेत.
