Download App

आनंद महिंद्रांनी शेअर केला ‘टॉप ऑफ माउंट एव्हरेस्ट’ व्हिडिओ; पाहून थक्क व्हाल

  • Written By: Last Updated:

Anand Mahindra : प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा ट्विटरवर नेहमीच अनोखे आणि मनोरंजक व्हिडिओ पोस्ट शेअर करण्यासाठी ओळखले जातात. आता त्यांनी जगातील सर्वोच्च पर्वतशिखर अशी बिरुदावली मिरवणाऱ्या माउंट एव्हरेस्टचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ वरून एव्हरेस्ट शिखर दाखवत आहे. हे दृश्य पाहणे खरोखरच एक अद्भुत अनुभव आहे. या व्हिडिओला सोशल मीडिया युजरकडून खूप पसंती मिळत आहे.

सामान्य माणूस माउंट एव्हरेस्ट एकतर पुस्तकात पाहतो किंवा टिव्हीवर. गेल्या काही वर्षात अनेक गिर्यारोहकांनी एव्हरेस्टच्या शिखराला स्पर्श केला आहे पण त्याच्या माथ्यावरून कसे दृष्य दिसते, याची सामान्य माणूस केवळ कल्पनाच करू शकतो. मात्र आता आनंद महिंद्रांनी सामान्य माणसाचे स्वप्न सत्यात उतरवले आहे.

BCCIच्या माजी प्रमुखांवर अंबाती रायुडूचा मोठा आरोप, म्हणाला ‘माझं करिअर खराब करण्याचा प्रयत्न केला’

आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ माउंट एव्हरेस्टच्या सर्वोच्च शिखरावरून 360 दृश्यांसह तयार करण्यात आला आहे आणि येथून जगातील सर्वात उंच शिखराचे विहंगम दृश्य पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. टॉप व्ह्यूच्या 360-डिग्री व्हिडिओमध्ये, आपण पाहू शकता की काही साहसी गिर्यारोहक येथे थांबले आहेत आणि येथून पृथ्वीचे अनोखे दृश्य पहात आहेत. बाजूला सूर्य दिसतो. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘द टॉप ऑफ माउंट एव्हरेस्ट. तुम्हाला शिखरावर नेणारी ती अनुभूती आज पूर्ण झाली. या व्हिडिओचे श्रेय रेनमेकर 1973 ला देण्यात आले आहे.

Tags

follow us