BCCIच्या माजी प्रमुखांवर अंबाती रायुडूचा मोठा आरोप, म्हणाला ‘माझं करिअर खराब करण्याचा प्रयत्न केला’
अंबाती रायुडूने आयपीएल 2023 नंतर क्रिकेटला अलविदा केले. तो या हंगामात महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जचा भाग होता. मात्र, निवृत्तीनंतर अंबाती रायडू पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. खरं तर, बीसीसीआयचे माजी अंतरिम प्रमुख आणि टीम इंडियाकडून खेळणारे शिवलाल यादव यांच्यावर अंबाती रायडूने मोठा आरोप केला आहे. शिवलाल यादवने सुरुवातीच्या दिवसांत आपलं करिअर खराब करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप अंबाती रायडूने केला आहे. (ambati-rayudu-reaction-on-ex-bcci-chief-shivlal-yadav-here-know-details)
‘मी शिवलाल यादव यांचा मुलगा अर्जुन यादवसोबत चांगले क्रिकेट खेळत होतो, पण…’
अलीकडेच अंबाती रायडूने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला. आता त्याने खुलासा केला आहे की शिवलाल यादव त्यांचा मुलगा अर्जुन यादवची मर्जी राखत असत, त्यावेळी शिवलाल यादव हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते. अंबाती रायडू म्हणाला की, मी लहान असताना माझ्या कारकिर्दीत राजकारण सुरू झाले. हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे तत्कालीन अध्यक्ष शिवलाल यादव यांचा मुलगा अर्जुन यादव याच्यासोबत मी चांगले क्रिकेट खेळायचो, पण मला सतत त्रास दिला जायचा, तो आपल्या मुलासाठी हे करत होता. तसेच त्यांनी मला संघातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.
Ashes 2023: नॅथन लियॉनच्या चेंडूवर विचित्र पद्धतीने आऊट झाला हॅरी ब्रूक, पाहा व्हिडिओ
‘मी भारत अ साठी चमकदार कामगिरी केली, पण…’
शिवलाल यादवचे जवळचे मित्र 2004 मध्ये निवड समितीचा भाग बनले, असे अंबाती रायडूचे म्हणणे आहे. त्यावेळी मी भारत-अ साठी चमकदार कामगिरी केली होती, पण असे असूनही मला संधी मिळाली नाही. त्यानंतर परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत गेली, जवळपास 4 वर्षे मी अंधारात होतो. अंबाती रायडूने 2005 मध्ये हैदराबाद सोडले, त्यानंतर तो आंध्र प्रदेशकडून खेळू लागला. तसेच अंबाती रायडू म्हणाला की, त्यावेळी एमएसके प्रसाद आंध्र प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे नेतृत्व करत होते, मात्र त्यांच्या कार्यकाळात मला कोणतीही अडचण आली नाही.