ATM Rules : एप्रिल महिना सुरु होण्यासाठी अवघ्या काही दिवस शिल्लक असताना एटीएम संबंधित एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. या अपडेटनुसार, 1 एप्रिल 2026 पासून एचडीएफसी बँक आणि पंजाब नॅशनल बँकसह अनेक बँका एटीएमच्या नियमांमध्ये बदल करणार आहे. या बदला थेट परिणाम ग्राहकांवर होणार आहे. या बदलांमध्ये व्यवहारांची गणना करण्याची पद्धत, लागू होणारे शुल्क आणि काही विशिष्ट डेबिट कार्ड्ससाठीच्या दैनंदिन पैसे काढण्याच्या मर्यादेचा समावेश आहे.
UPI-आधारित ATM ट्रान्झॅक्शन
एचडीएफसी बँकेने दिलेल्या माहितीनुसार, 1 एप्रिलपासून एटीएममधून UPI द्वारे काढलेली रोख रक्कम आता ‘मोफत ट्रान्झॅक्शन ‘ मासिक मर्यादेमध्ये समाविष्ट केली जाणार आहे. आतापर्यंत, अशा ट्रान्झॅक्शन स्वतंत्रपणे हाताळले जात असे. नवीन नियम लागू झाल्यानंतर, जर एखाद्या ग्राहकाने UPI वापरून ‘कार्ड-विरहित’ (cardless) रोख रक्कम काढली, तर त्याची गणना त्यांच्यासाठी निश्चित केलेल्या मोफत ATM ट्रान्झॅक्शन च्या मर्यादेमध्ये केली जाईल.
फ्री ट्रान्झॅक्शननंतर लागू होणारे शुल्क
नवीन नियमांनुसार, जर एखाद्या ग्राहकाने फ्री ट्रान्झॅक्शनांची निर्धारित मर्यादा ओलांडली तर बँक प्रत्येक अतिरिक्त ट्रान्झॅक्शनला 23 रुपये शुल्क आकारेल. तसेच या शुल्काव्यतिरिक्त, लागू होणारे कर (Taxes) देखील आकारले जातील. सध्याच्या नियमांनुसार, ग्राहकांना एचडीएफसी बँकेच्या ATM मधून दरमहा 5 मोफत वेळा पैसे काढण्याची मुभा आहे. याउलट, इतर बँकांच्या ATM मधून पैसे काढण्यासाठी मेट्रो शहरांमध्ये महिन्यातून 3 वेळा आणि बिगर-मेट्रो शहरांमध्ये महिन्यातून 5 वेळा मोफत ट्रान्झॅक्शन करण्याची परवानगी आहे.
बँकेच्या मते, या बदलांमागील उद्देश विविध रोख रक्कम काढण्याच्या पद्धतींमधील शुल्क रचना प्रमाणित करणे आणि लागू होणाऱ्या शुल्काबाबत अधिक पारदर्शकता आणणे हा आहे.
PNB नेही नियमांमध्ये बदल केले
पंजाब नॅशनल बँकेने (PNB) देखील काही विशिष्ट डेबिट कार्ड्ससाठीच्या ATM मधून पैसे काढण्याच्या मर्यादेत बदलांची घोषणा केली आहे. हे बदल 1 एप्रिलपासून लागू होतील. बँकेच्या माहितीनुसार, कार्डांच्या काही विशिष्ट श्रेणींसाठी दैनंदिन रोख रक्कम काढण्याची मर्यादा कमी केली जाईल. या नवीन मर्यादांचे नेमके स्वरूप काय असेल, याविषयीचा सविस्तर तपशील अद्याप प्रसिद्ध करण्यात आलेला नाही.
UPI-आधारित ATM मधून पैसे काढण्याची प्रक्रिया
UPI-आधारित ATM मधून पैसे काढण्यासाठी डेबिट कार्डची आवश्यकता नसते. ग्राहक केवळ ATM मशीनवर प्रदर्शित केलेला QR कोड स्कॅन करतात आणि त्यांच्या UPI ॲप्लिकेशनचा वापर करून व्यवहाराला अधिकृत संमती देतात. त्यानंतर, मशीनमधून रोख रक्कम बाहेर येते. डिजिटल पेमेंट्स आणि रोख रक्कम काढणे यांमधील अंतर कमी करण्यासाठी अनेक बँका या सुविधेचा विस्तार करत आहेत.
Anushka Shetty : 44 व्या वर्षी लग्नबंधनात अडकणार ‘देवसेना’; कोणासोबत थाटणार संसार?
