Download App

किती असते इंजिन ऑइलची लाईफ? खराब ऑईल देईल खिशाला झटका..

कंपनीच्या अधिकृत सर्व्हिस सेंटर मधून जर वाहनाची सर्व्हिसिंग केली तर पुढील सर्व्हिसिंग कधी करायची याची माहिती वाहन मालकाला दिली जाते.

Auto Care Tips : वाहनाच्या इंजिनमधील ऑईल योग्य वेळी बदलणे जास्त (Auto Care Tips) गरजेचे असते. याकडे जर दुर्लक्ष केले तर वाहनाची लाईफ देखील कमी होऊ लागते. खराब इंजिन ऑईलमुळे (Engine Oil) वाहनांच्या कार्यक्षमतेवर देखील प्रतिकूल परिणाम होतो. वाहनाचा मायलेज देखील कमी होतो. आता जर वाहनाचे इतके नुकसान होणार असेल तर वेळच्या वेळी इंजिन ऑईल बदलणे फायद्याचे ठरेल.

तुम्ही जर वाहन चालवत असाल आणि तुम्हाला इंजिन ऑईल कधी बदलायचे याची माहिती नसेल तर अडचणी येऊ शकतात. गाडीच्या मायलेज आणि कार्यक्षमतेवर वाईट परिणाम होतो. तुम्हाला कदाचित माहिती नसेल पण इंजिन ऑईलची देखील लाईफ (Engine Oil Life) असते. याबाबत तुम्हाला जास्त माहिती नसेल तर आज आपण याबाबत माहिती घेऊ या..

Car Engine Oil Life

कंपनीच्या अधिकृत सर्व्हिस सेंटर मधून जर वाहनाची सर्व्हिसिंग केली तर पुढील सर्व्हिसिंग कधी करायची याची माहिती वाहन मालकाला दिली जाते. साधारण दहा हजार किलोमीटर चालल्यानंतर सर्व्हिसिंग करा असे सांगितले जाते. म्हणजेच सर्विस सेंटरचा असा अंदाज असतो की इंजिन ऑईलची लाईफ दहा हजार किलोमीटर पर्यंत आहे. यानंतर कारच्या इंजिनमधील ऑईल बदलावे लागते.

काम की बात! क्रेडिट कार्ड बंद करताय मग, CIBIL स्कोअरही कमी होणार?, जाणून घ्या गणित

Bike Engine Oil Life

दुचाकी किंवा स्कूटरची सर्व्हिसिंग करताना इंजिनमध्ये ऑईल टाकले जाते. पण तुम्हाला माहिती आहे का या ऑईलची लाईफ नेमकी किती आहे. साधारण दोन हजार किंवा जास्तीत जास्त अडीच हजार किलोमीटर झाल्यानंतर पुन्हा सर्व्हिसिंग करा असे सर्विस सेंटरकडून सांगितले जाते. याचा अर्थ असा की अधिकृत सर्व्हिस सेंटर चालकांना वाटते की दुचाकी अडीच हजार किलोमीटर चालल्यानंतर ऑईलची लाईफ संपते.

ऑईल चेंज केलेच नाही तर काय होईल

जर तुम्ही योग्य वेळी वाहनातील ऑईल बदलले नाही तर याचा परिणाम वाहनाच्या कार्यक्षमतेवर होतो. जर वाहनाचा परफॉर्मन्स कमी झाला तर याचा परिणाम मायलेज वर देखील होईल. यामुळे जास्त पेट्रोलचा वापर लागेल. सध्या पेट्रोलच्या किमती (Petrol Price) पाहिल्या तर ही गोष्ट नक्कीच परवडणारी नाही. त्यामुळे कारमधील इंजिन ऑईल कधी बदलायचे याची माहिती घेऊन त्यानुसार वेळेवर वाहनातील ऑईल बदलत राहिले तर वाहन व्यवस्थित राहील.

धक्कादायक! पाच महिन्यांत भारतात 10 दिवस सर्वाधिक प्रदूषण; ‘या’ शहराचा पहिला क्रमांक 

follow us

संबंधित बातम्या