मुंबई : निरोगी शरीरासाठी आहार हा महत्वाचा आहे तशीच झोप देखील महत्वाची आहे. यातच जर आवश्यक झोप न मिळाल्यास शरीराक समस्या उद्भवतात. यामध्ये डोके दुखणे, पित्ताचा त्रास सुरु होणे, आदी समस्या उद्भवतात. यासाठी डॉक्टर योग्य वेळेत झोपण्याचा सल्ला देतात. मात्र अनेकांना लवकर झोप येत नसल्याने या समस्यांना सामोरे लावे जागते. झोप न येण्यामागे अनेक कारणे असून यामध्ये रात्रीचा आहार काय घेतात हे देखील महत्वाचे आहे. झोपण्यापूर्वी काही पदार्थांचे सेवन टाळले पाहिजे याबाबत आज आपण जाणून घेऊ.
काय खाले पाहिजे, जाणून घ्या
रात्री झोपण्यापूर्वी फायबरचे प्रमाण जास्त असणारी फळं आणि भाजा यांचे सेवन करणे फायदेशीर ठरते. यामूळे तुम्हाला झोप देखील चांगली येईल. मात्र रात्री झोपण्याआधी ड्रायफ्रुट्स, बीन्स, ब्रोकोली, फ्लॉवर इत्यादी खाणे टाळा. यामूळे झोपेवर परिणाम होऊ शकतो.
चहा-कॉफी
आजही अनेकांना रात्री झोपण्यापूर्वी चहा तसेच कॉफी पिण्याची सवय असते. मात्र ही गोष्ट तुमच्या झोपेच्या आड येऊ शकते. चहा आणि कॉफीमध्ये कॅफिन आढळते. हे रक्तदाब वाढवण्याचे काम करते. ज्यामुळे थकवा जातो. चहा आणि कॉफी प्यायल्यानंतर झोप येत नाही. रात्री कॅफिनयुक्त पदार्थांचे सेवन टाळावे.
मोदींच्या हुकूमशाही कारभारामुळे देश आर्थिक संकटात, पटोलेंनी लगावला टोला
तिखट पदार्थांचे सेवन टाळावे
एक गोष्ट लक्षात ठेवावी ती म्हणजे रात्री झोपण्याआधी अतितिखट अशा पदार्थांचे सेवन करणे टाळावे. तिखट पदार्थांचे सेवन केल्याने पोटदुखी, अॅसिडिटी होणे आदी समस्या जाणवू शकतात. परिणामी झोप न लागण्याची समस्या उद्भवतेय
एलॉन मस्क खरेदी करणार Silicon Valley Bank?
मद्यपान टाळा
आजकाल तणावग्रस्त परिस्ठितीमूळे अनेकजण दारुचे सेवन करु लागतात. यातच दिवसभरातील तणावामूळे अनेक लोक रात्री झोपताना मद्यपान करतात. पण रात्री मद्यपान करुन झोपण्याची सवय लागली तर मद्यपान न करता झोप येत नाही. यामूळे मद्यपान करण्याची सवय टाळावी असा सल्ला डॉक्टर देत असतात.