सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनच्या मदतीने म्युच्युअल फंडात कशी गुंतवणूक करावी? घ्या जाणून
जर गुंतवणूकदार प्रति महा 500 रुपयांची गुंतवणूक करत असेल तर ही अत्यंत छोटी रक्कम ठरेल. यामुळे जो परतावा मिळेल.
म्युच्युअल फंडात आता इतर गुंतवणूक पर्यायांपेक्षा अधिक रिटर्न मिळण्याची शक्यता आहे. (Investment) अर्थात सर्वच म्युच्युअल फंड्सने मालामाल केले असा त्याचा अर्थ नाही. तर काही फंड्सने गुंतवणूकदारांना गोत्यातही आणले आहे. त्यांनी नकारात्मक परतावा दिला आहे. त्यामुळे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना सावध असणे आवश्यक आहे.
जर गुंतवणूकदार प्रति महा 500 रुपयांची गुंतवणूक करत असेल तर ही अत्यंत छोटी रक्कम ठरेल. यामुळे जो परतावा मिळेल. तो ही मोठा नसेल. त्याऐवजी दरमहा 2000 रुपयांची गुंतवणूक करणे आवश्यक आहे. जर तुम्ही योग्य स्ट्रॅटर्जी वापरली आणि आर्थिक शिस्त लावली तर या दोन हजार रुपयातून मोठ्या फंडाची उभारणी करता येईल.
Muhurat Trading 2025: गेल्या 10 दिवाळीत गुंतवणूकदारांची 8 वेळा चांदी! यंदाही कमाई होणार?
तर 2000 रुपये मासिक SIP मधून 1.59 कोटींचा फंड तयार होऊ शकतो. त्यासाठी गुंतवणूकदाराला दरमहा 2000 रुपयांची SIP करावी लागेल. एकही SIP न चुकवता जर गुंतवणूकदार सलग 30 वर्षांपर्यंत एसआयपी सुरु ठेवेल आणि या काळात तो यातून एक छद्दामही रक्कम काढणार नाही तर कोट्याधीश होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकतं. त्यासाठी एक ट्रीक वापरणे फायदेशीर ठरेल.
टॉप-अप SIP मध्ये दरवर्षी मासिक SIP ची रक्कम 10% वाढवावी लागते. अशात जर तुम्ही 2000 रुपयांचा टॉप-अप SIP 30 वर्षांसाठी सुरु ठेवाल तर तुम्ही एकूण 39.47 लाख रुपयांची गुंतवणूक कराल. 30 वर्षांनी तुम्हाला एकूण 1.59 कोटी रुपये मिळतील. यामध्ये केवळ 1.20 कोटी रुपयांचा परतावा असेल. चक्रवाढ व्याजाचा फायदा गुंतवणूकदाराला मिळेल. त्यामुळे बचतीवर व्याज आणि त्यावर पुन्हा व्याज हे चक्र अखंडीत सुरु राहिल.
