Download App

Java Plum : दातांपासून ह्रदयापर्यंत आंबड-गोड जांभूळ ठरते रामबाण!

Benefits of Java Plum : मित्रांनो, सध्या जांभूळ या रानफळाचा सीजन सुरू आहे. इतर फळाप्रमाणे जांभळाचा सीजन जास्त काल नसतो. उन्हाळा संपण्याच्या आणि पाऊस पडण्याच्या दरम्यान म्हणडे वटपौर्णिमेच्या दरम्यान जांभळ यायाला सुरूवात होते. या फळाचा कालावधी जरी कमी असला तरी देखील त्याचे औषधी गुणधर्म अनंत आहेत. ज्याचा फायदा दातांपासून ह्रदयापर्यंत अनेक आजरांवर होतो. त्यामुळे जाणून घेऊयात आंबड-गोड जांभळाचे औषधी गुणधर्म… ( Benefits of Java Plum Teeth to Heart)

अंशत: ठाणबंद पध्दतीने संगोपनासाठी शेळी/मेंढी गट वाटप करणे

जांभळापासून ज्यूस, व्हिनेगर, गोळ्या, कॅप्सूल आणि चूर्ण तयार केले जाते. त्याच्या सेवनाने आजार दूर होण्यास मदत होते. जांभळामध्ये पाणी, प्रथिनं आणि लिपिड्स म्हणजेच फॅट्स असतात. त्याचबरोबर कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम, व्हिटॅमिन सी, थायामिन, रिबोफ्लेविन, नियासिन, व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन ए, यांसारखे पोषक तत्वे असतात.

आंबड-गोड जांभळाचे औषधी गुणधर्म आणि फायदे :

जांभळामध्ये असलेल्या पाण्यामुळे स्ट्रोक आणि उच्च रक्तदाब टाळण्यास मदत होते. त्यातबरोबर जांभळातील अॅंटीऑक्सिडंट कर्करोगाच्या पेशींच्या वाढीला मदत करणाऱ्या मुक्त रॅडिकलला रोखते.

Ahmednagar News : औरंगजेबाच्या पोस्टर वादादरम्यान अहमदनगरमध्ये हिंदू-मुस्लीम ऐक्य; वारकऱ्यांसाठी…

जांभळामध्ये कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम, व्हिटॅमिन सी, थायामिन, रिबोफ्लेविन, नियासिन, व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन ए, यांसारखे पोषक तत्वे असतात. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. जांभळाच्या सेवनने त्वचेत कोलेजन तयार होते.

डोकेदुखीचा त्रास होत असल्यास जांभूळ खाणे आरामदायी ठरते. पित्तावर देखीस जांभळाचे सेवन गुणकारी ठरते. त्याचबरोबर जांभळाच्या सेवनाचा सर्वात जास्त फायदा मधुमेह असणाऱ्या लोकांना असतो. त्यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. खोकला आणि श्वसनाच्याच्या समस्यांवर देखील ते गुणकारी ठरते. मात्र, रिकाम्या पोटी जांभूळ खाणे टाळावे. जेवणानंतर जांभळाचे सेवन फायदेशीर ठरते. तसेच जांभळाचे अति सेवन केल्याने बद्धकोष्ठचा त्रास जाणवू शकतो.

Tags

follow us