IOC Session:ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश होणार का? मुंबईत होणाऱ्या IOC च्या अधिवेशनात होणार निर्णय

  • Written By: Published:
IOC Session:ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश होणार का? मुंबईत होणाऱ्या IOC च्या अधिवेशनात होणार निर्णय

Cricket in Olympics: 2028 मध्ये लॉस एंजेलिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट खेळाचा समावेश केला जाईल का? 15 ते 17 ऑक्टोबर दरम्यान मुंबईत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (IOC) 141 व्या अधिवेशनात या प्रश्नाचे उत्तरमिळणार आहे. या बैठकीचा उद्घाटन समारंभ 14 ऑक्टोबर रोजी जिओ वर्ल्ड सेंटर (JWC) येथे होणार आहे. IOC च्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या निवेदनानुसार, या सत्रापूर्वी 12 ते 14 ऑक्टोबर दरम्यान IOC कार्यकारी मंडळाची बैठक होणार आहे. (ioc-141st-session-in-mumbai-all-eyes-on-cricket-in-la-2028-olympics)

IOC च्या बैठकीबाबत टाइम्स इंडियाला दिलेल्या निवेदनात एका सूत्राने सांगितले की, जर क्रिकेटचा 2028 च्या उन्हाळी ऑलिंपिकमध्ये समावेश करण्यात आला. त्याची घोषणा मुंबई अधिवेशनात मोठ्या थाटात केली जाणार आहे. त्याआधी निर्णय घेतला जाईल, मात्र अधिकृत काहीही या अधिवेशनातच जाहीर केले जाईल.

आयसीसीने ऑलिम्पिकमध्ये 6 संघांच्या स्पर्धांचा प्रस्ताव दिला आहे

ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यासाठी आयसीसीने 6 संघांचा कार्यक्रम प्रस्तावित केला आहे. त्यात महिला आणि पुरुष अशा दोन्ही संघांचा समावेश असेल. T20 स्वरूपाच्या या स्पर्धेचे सामने पूर्ण होण्यासाठी सुमारे 3 तास लागतील.

WTC फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया मजबूत, लंचपर्यंत मोठी आघाडी

1900 मध्ये पॅरिस गेम्समध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला. यानंतर 128 वर्षे उलटली तरी क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश झालेला नाही. क्रिकेटची लोकप्रियता पाहता IOC त्याचा समावेश करण्याचा निर्णय घेऊ शकते. क्रिकेटचा समावेश केला तर मीडिया हक्कांद्वारे मिळणाऱ्या कमाईतही तिपटीने वाढ होणार आहे. ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याच्या आयसीसीच्या निर्णयाला बीसीसीआयही पाठिंबा देत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह हे ICC ऑलिम्पिक वर्किंग ग्रुपचे सदस्य आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube