WTC फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया मजबूत, लंचपर्यंत मोठी आघाडी

WTC फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया मजबूत, लंचपर्यंत मोठी आघाडी

WTC Final 2023 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याचा आज चौथा दिवस आहे. उपाहारापर्यंत ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 6 बाद 201 धावा केल्या आहेत. आता त्यांची आघाडी 374 धावांची झाली आहे.

टीम इंडियाला पहिल्या डावात 296 धावाच करता आल्या. त्यामुळे पहिल्या डावाच्या आधारे ऑस्ट्रेलियाला 173 धावांची आघाडी मिळाली होती. अजिंक्य रहाणे आणि शार्दुल ठाकूर यांनी तिसऱ्या दिवशी भारतीय संघासाठी शानदार फलंदाजी केली. रहाणेने 89 आणि शार्दुलने 51 धावांचे योगदान दिले होते.

लेक्स कॅरी 61 चेंडूत 41 धावा केल्यानंतर खेळत आहे. मिचेल स्टार्कने 61 चेंडूत 41 धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येने दुसऱ्या डावात 200 धावांचा टप्पा ओलांडला आहे. लंच ब्रेकपर्यंत संघाने 374 धावांची आघाडीही केली आहे.

Sudipto Sen: द केरळ स्टोरीनंतर सुदिप्तो सेन यांनी ‘या’ नव्या सिनेमाची केली घोषणा

विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद 469 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने पहिल्या डावात 296 धावा केल्या. अजिंक्य रहाणेने भारतासाठी चांगली कामगिरी केली. त्याने 89 धावांची खेळी खेळली. रवींद्र जडेजाने 51 चेंडूत 48 धावा केल्या. शार्दुल ठाकूरने 51 धावांची खेळी केली. यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या डावात फलंदाजी करत आहे. ऑस्ट्रेलिया कॅमेरून ग्रीन 25 धावा करून बाद झाला. उस्मान ख्वाजा 13 धावा करून बाद झाला. स्मिथ 34 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube