Download App

UPI वापरणाऱ्यांसाठी मोठा धक्का; व्यवहारांवर द्यावे लागणार चार्जेस

नवी दिल्ली : तुम्ही युपीआय (UPI)पेमेंट करताय? मग ही तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कारण आता युपीआय पेमेंट करत असताना काही चार्जेस द्यावे लागणार आहेत. नवीन आर्थिक वर्षापासून म्हणजेच 1 एप्रिल 2023 पासून युपीआय (UPI) ने व्यवहार करणं जरासं महागात पडणार आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेसन ऑफ इंडियाने (NPCI) युपीआयच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या मर्चंट ट्रान्झॅक्शनवर प्रीपेड पेमेंट इंस्ट्रमेंट्स (PPI) फी लागू करण्यास सांगितली आहे. त्यांच्या पत्रकानुसार 2000 रुपयांहून अधिकच्या युपीआय ट्रान्झॅक्शनवर चार्ज द्यावा लागणर आहे. हा मर्चेंट ट्रान्झॅक्शन्स अर्थात व्यापाऱ्यांना पेमेंट करणाऱ्या युजर्सला द्यावा लागणार आहे.

Pune News : सहायक पोलिस आयुक्त घनवट यांच्यावर १२.५ लाखांच्या खंडणीचा गुन्हा!

NPCI च्या पत्रकानुसार प्रीपेड पेमेंट इंस्ट्रमेंट्सच्या (PPI) माध्यमातून UPI पेमेंटवर 1.1 ‘टक्का इंटरचेन्ज फीस लागेल. विशेष म्हणजे, PPI मध्ये व्हॉलेट किंवा कार्डच्या माध्यमाने ट्रान्झॅक्शन होते.

इंटरचेन्ज फीबाबत सांगायचं झालं तर कार्डच्या माध्यमाने केल्या जाणाऱ्या ट्रान्झॅक्शनशी संबंधित आहे, तसेच देवाण घेवाण स्वीकार करणे, प्रोसेसिंग किंवा मंजूरीसाठी लागणारा खर्च भागवण्यासाठी आकारली जाते.

बॅंक खाते आणि पीपीआय व्हॉलेट यांच्यात पीअर-टू-पीअर (पी2पी) आणि पीअर-टू-पीअर-मर्चंट (पी2पीएम) ट्रांझॅक्शन इंटरचेन्ज करण्याची आवश्यकता नसते. NPCI चा हा प्रस्ताव आगामी 1 अप्रिलपासून लागू होणार आहे. NPCI कडून 30 सप्टेंबर 2023 किंवा यापूर्वी याची समीक्षा केली जाणार आहे.

Tags

follow us