ब्लॅकमेलिंगसाठी पाच कोटी तुम्हाला कोणत्या माऊलीने मागितले ? ; अंधारेंचा शिरसाटांना थेट सवाल

ब्लॅकमेलिंगसाठी पाच कोटी तुम्हाला कोणत्या माऊलीने मागितले ? ; अंधारेंचा शिरसाटांना थेट सवाल

शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्याबाबत केलेले वादग्रस्त वक्तव्याचे जोरदार पडसाद (Maharashtra Politics) उमटत आहेत. आज दिवसभरात विरोधकांनी शिरसाट यांच्यावर टीकेची झोड उठविली. त्यानंतर अंधारे यांनीही पत्रकार परिषदेत शिरसाट यांच्यावर घणाघाती टीका केली. तसेच शिरसाट यांच्यावर अब्रु नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे सांगितले. या पत्रकार परिषदेत त्यांनी शिरसाट यांना राज्यातील सत्तातरांच्या वेळी 72 कोटी रुपये मिळाल्याचा खळबळजनक दावा केला.

अंधारे म्हणाल्या, ‘ज्या शिरसाटांनी अत्यंत घाणेरड्या भाषेत वक्तव्य केले. त्यांनी कुणी प्रश्न विचारावेत की पाटील नावाची व्यक्ती कोण आहे ज्या व्यक्तीला शिरसाट अडकवू पाहत होते. यावर मी वेळ आल्यावर नक्कीच बोलणार आहे.’

Sanjay Shirsath यांचा अंधारेंना धमकीवजा इशारा… ‘परळीतील धिंड बद्दल बोलू का…?

‘ज्यावेळी यांनी गुवाहाटीचा दौरा केला त्यावेळी लोक सांगतात की यांच्या घरात 72 कोटी रुपयांची रक्कम यांच्या घरात आली म्हणे. त्यातले पाच कोटी रुपये ब्लॅकमेलिंगसाठी तुमच्याच संपर्कातल्या कुण्या माऊलीने तुम्हाला मागितले ?’ असा सवाल त्यांनी केला. शिरसाट जरे हे नाकारणार असतील तर मात्र मला यावर बोलावे लागेल असा इशारा अंधारे यांनी यावेळी दिला.

शिरसाट यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर अंधारे म्हणाल्या, ‘शिरसाट यांनी अत्यंत घाणेरड्या भाषेत वक्तव्य केले आहे. मी सुद्धा कायद्याची अभ्यासक आहे. या वक्तव्यावरून त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा.

मात्र, जे सरकार शीतल म्हात्रे प्रकरणात अत्यंत खोटारड्या पद्धतीने मुलांना उचलते आणि गुन्हे टाकते ते सरकार विरोधकांच्या महिलांना जणू अब्रू नसतेच अशा पद्धतीने वागत असेल तर मग काय बोलणार ?’

‘मुख्यमंत्री शिंदेंनी आता हे स्पष्ट केले पाहिजे की तुम्हाला फक्त तुमच्या पक्षातील महिलांची इभ्रत महत्वाची आहे का ?,  इतर पक्षातील महिलांच्या बाबतीत तुम्ही काहीच बोलणार नाहीत का ?’, असे सवाल अंधारे यांनी केले.

निवडणुका कधीही होतील, तयार राहा ; जयंत पाटलांचे पदाधिकाऱ्यांना आदेश

त्या पुढे म्हणाल्या, शिंदेंनाच आता प्रश्न विचारावे लागतील की गुलाबराव पाटील, अब्दुल सत्तार किंवा संजय शिरसाट असतील या लोकांची पात्रता हीच आहे का की हे लोक महिलांच्या बाबतीत अत्यंत गलिच्छ भाषेत बोलतात. म्हणून तुम्ही त्यांना आमदार म्हणून मंत्री म्हणून तुमच्याबरोबर ठेवले आहे का ?, त्यांचे ऐकून घेत आहात का ? हे मी का बोलतेय तर शिरसाट यांनी ज्या घाणेरड्या पद्धतीने वक्तव्य केले मात्र ज्यांचे वागणे चांगले असते त्यांना या बोलण्याचा निश्चितच त्रास होतो.’

शिरसाटांचा पाय आणखी खोलात ! महिला आयोगाने पोलीस आयुक्तांना धाडले पत्र

 शिरसाटांच्या बोलण्यात माज

‘शिरसाट अजूनही बोलताना माझ्या बाबतीत एकेरी उल्लेख करतात. त्यांच्या बोलण्यातून अजूनही माज जाणवतो. त्यांचे घर कोणत्या दिशेला आहे हे अजूनही मला माहित नाही. मी कधीही त्यांच्या घरी गेले नाही.

‘दुसऱ्या कोणाला संबोधित करताना आपल्याकडे भाऊ, दादा असे म्हणण्याची पद्धत आहे. आता शिरसाट यांना जर भाऊ, दादा हे शब्द सुद्धा रुतत असतील तर त्यांनी त्यांच्यासाठी एखादा शिवीवाचक शब्द सांगावा. कारण मला काही शिवी देता येत नाही’, असा टोलाही त्यांनी लगावला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube