Download App

लोकप्रिय कारवर बंपर डिस्काउंट, एक नंबर सेफ्टी, भन्नाट फीचर्स अन् किंमत फक्त 4.23 लाख

Maruti Alto K10 : देशातील सर्वात मोठी ऑटो कंपनी मारुती सुझुकीने (Maruti Suzuki) ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी पुन्हा एकदा जबरदस्त ऑफर जाहीर

  • Written By: Last Updated:

Maruti Alto K10 : देशातील सर्वात मोठी ऑटो कंपनी मारुती सुझुकीने (Maruti Suzuki) ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी पुन्हा एकदा जबरदस्त ऑफर जाहीर केले आहे. या ऑफरचा फायदा घेत तुम्ही देशात सर्वात जास्त विक्री होणारी कार अगदी कमी किंमतीमध्ये घरी आणू शकतात. होय, मारुतीने लोकप्रिय कार मारुती अल्टो के 10 (Maruti Alto K10) वर बंपर डिस्काउंट ऑफर जाहीर केले आहे.

Maruti Alto K10 डिस्काउंट ऑफर

कंपनी या कारवर तब्बल 71,960 रुपये बचत करण्याची संधी देत आहे. कंपनी या कारच्या ऑटोमॅटिक व्हेरियंटवर सर्वाधिक सूट देत आहे. कंपनीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, ग्राहकांना कॅश डिस्काउंट, एक्सचेंज बोनस आणि स्क्रॅपेज बोनस सारखे फायदे या ऑफरअंतर्गत मिळणार आहे. भारतीय बाजारात या लोकप्रिय कारची किंमत 4.23 लाख रुपयांपासून ते 6.21 लाख रुपयांपर्यंत आहे. VXi आणि VXi+ या दोन AMT व्हेरियंट आहेत ज्यांची किंमत 5.60 लाख रुपये आणि 6.10 लाख रुपये आहे.

ऑफर तपशील

कंपनीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार कंपनी या ऑफरअंतर्गत कॅश डिस्काउंट 31,500 + 10,460 (किट कॉम्प्लीमेंट्री) देत आहे. तर 15 हजारपर्यंत एक्सचेंज बोनस आणि 25 हजारपर्यंत स्क्रॅपेज बोनस आणि 5 हजारपर्यंत कॉर्पोरेट डिस्काउंट देत आहे.

Maruti Alto K10 फीचर्स

या कारमध्ये एका पेक्षाएक भन्नाट फीचर्स कंपनीकडून देण्यात आले आहे. या कारमध्ये मागील प्रवाशांसाठी तीन-पॉइंट सीट बेल्ट देखील आहेत. या कारच्या सेफ्टी किटमध्ये एबीएस (अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम), ईएसपी (इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम), ईबीडी (इलेक्ट्रॉनिक ब्रेक-फोर्स डिस्ट्रिब्युशन), ईएसपी (इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम), लगेज रिटेन्शन क्रॉसबार आणि मागील पार्किंग सेन्सर यांचा समावेश आहे.

तसेच तुम्हाला 7.0-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ब्लूटूथसह 2-डीआयएन स्मार्टप्ले ऑडिओ सिस्टम, ऑक्स आणि यूएसबी पोर्ट, पॉवर स्टीअरिंग, बिन एअर फिल्टर सारखे फीचर्स देखील या कारमध्ये पाहायला मिळणार आहे. ही हॅचबॅक कार 67 बीएचपी / 89 एनएम, 1.0 लिटर, 3-सिलेंडर के10 सी पेट्रोल इंजिन आणि 5-स्पीड मॅन्युअल आणि 5-स्पीड एएमटी या दोन गिअरबॉक्स पर्यायांसह येते. अल्टो के 10 24.39 किमी/लिटर (एमटी) आणि 24.90 किमी/लिटर (एएमटी) मायलेज देते.

कॅन्सरवरील लस उपलब्ध करून देण्याच्या महायुती सरकार विचाराधीन; अदिती तटकरे 

follow us