MG Comet EV : सर्वसामान्यांचं कारचं स्वप्न पूर्ण होणार; MG कडून खिशाला परवडणारी कार लाँच
Morris Garages Motor India अर्थात MG ने बुधवारी आपली इलेक्ट्रिक कार कॉमेट लॉन्च केली. या कारची किंमत 7.98 लाख रुपयांपासून सुरू असून सर्वसामान्यांना परवडणारी ही कार असणार आहे. ही एमजीची सर्वात स्वस्त, लहान आणि एंट्री लेव्हल इलेक्ट्रिक कार असणार आहे.
ही कार टाटाच्या Tiago EV पेक्षा सुमारे 50 हजार रुपये स्वस्त आहे. गुजरातमधील हलोल प्लांटमध्ये कारचे उत्पादन सुरू झाले आहे. एमजी झेडएस ईव्ही नंतर एमजीची ही दुसरी ईव्ही आहे. कारची बुकिंग 15 मे पासून सुरू होत आहे.
कारची डिलिव्हरीही मे पासून सुरू होणार आहे. EV पूर्ण चार्ज झाल्यावर 230 किमीची रेंज मिळेल. इलेक्ट्रिक कार 519 रुपयांमध्ये 1000 किलोमीटर धावणार असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला. यामध्ये नेक्स्ट लेव्हल पर्सनलायझेशन देण्यात आले असून तुम्ही कंपनीने बनवलेले फंकी बॉडी रॅप्स, मस्त स्टिकर्स कारवर लावू शकणार आहात.
या कारमध्ये फोल्डेबल स्प्लिट सीट कॉन्फिगरेशन आहे. म्हणजेच, तुम्ही बूट स्पेस वाढवू शकता येणार आहे. कंपनीकडून ही कार Apple Green with Black Roof, Aurora Silver, Starry Black, Candy White आणि Candy White with Black Roof. कलरमध्ये कार लाँच करण्यात आली आहे. तसेच ईव्हीमध्ये दोन दरवाजे देण्यात आले असून त्याची आसनक्षमता 4 लोकांची आहे.
Shah Rukh Khan : किंग खानला दिलासा; ‘या’ सिनेमातील लीक क्लिप्स हटवण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश
19 एप्रिल रोजी दिल्लीतील गुडगाव येथे एका कार्यक्रमात कंपनीने या कारची पहिली झलक दाखवली होती. एमजीने आपल्या कारची नावे ऐतिहासिक गोष्टींवर ठेवली आहेत. ब्रिटीश विमान धूमकेतूच्या नावावरून या कारचे नाव देण्यात आले आहे. या कारची लांबी 2.9 मीटर आहे. म्हणजेच ती मारुतीच्या अल्टोपेक्षा लहान आहे.
एमजीने धूमकेतूला टॉलबॉय डिझाइन देण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये एलईडी हेडलॅम्प, एमजी लोगो, समोरील बाजूस डेटाइम रनिंग लॅम्प, मागील बाजूस एलईडी टेल लाइट्स, क्रोम डोअर हँडल, फ्रंट आणि रियर पार्किंग कॅमेरे देखील मिळतील. EV मध्ये 12-इंच एरोडायनामिक डिझाइन व्हील देण्यात आले आहेत.
दरम्यान, टाटाने Tiago कार सुरुवातील 8.49 लाखांच्या किमतीत Tiago लाँच केली होती आता एमजी धूमकेतूची किंमत 7.98 लाख रुपयांपासून सुरू आहे, म्हणजेच Tiago पेक्षा जवळपास 50000 रुपये स्वस्त आहे.