Viral Video: किली पॉलचा मराठमोळा अंदाज व्हायरल, बहिणीसोबत थिरकला ‘महाराष्ट्र शाहीर’ सिनेमातील गाण्यावर

Viral Video: किली पॉलचा मराठमोळा अंदाज व्हायरल, बहिणीसोबत थिरकला ‘महाराष्ट्र शाहीर’ सिनेमातील गाण्यावर

Kili Paul Viral Video: बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित ‘महाराष्ट्र शाहीर’ या सिनेमातील (Maharashtra Shaheer Cinema) ‘बहरला हा मधुमास’ (Bahar la Ha Madhumas Marathi song) हे गाणं सध्या मोठ्या प्रमाणात ट्रेंड होत असल्याचा बघायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून इन्स्टाग्राम, युट्यूब, फेसबुक उघडल्यावर ‘बहरला हा मधुमास’ हे एकच गाणं कानावर पडत असल्याचे दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kili Paul (@kili_paul)


या गाण्याची अनेक कलाकारांना तसेच सर्वसामान्यांना मोठ्या प्रमाणात भूरळ पडली आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध रील स्टार किली पॉलला (reel star Kili Paul) आणि त्याची बहिण निमा पॉल हिलाही या गाण्याची भूरळ बसले असल्याचे दिसून येत आहे. नुकतंच त्यांनी या गाण्यावर एक रिल व्हिडीओ शेअर केला आहे. किली पॉल नेहमीच अनेक भारतीय गाण्यावर रील (Indian song Reel ) बनवत असतो. आतापर्यंत त्याने अनेक बॉलिवूड गाण्यांवर रील्स बनवले आहेत. परंतु नुकतंच त्याने ‘बहरला हा मधुमास’ या लोकप्रिय मराठी गाण्यावर रील बनवला आहे. मला गाणे आणि डान्स दोन्हीही फार आवडले आहे, असे या गाण्याला कॅप्शन देत त्याने सांगितले आहे. या व्हिडीओमध्ये किली पॉल आणि त्याची बहिण हुबेहुब हुकस्टेप करत असलयाचे दिसून येत आहे.

यामध्ये निमा पॉल हिने अभिनेत्री सना शिंदे हिच्याप्रमाणे गाण्यातील हुकस्टेप कॉपी करत असल्याचा छोटासा प्रयत्न त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे ती या गाण्याचे लिपसिंकही करत असल्याचे दिसून येत आहे. या दोघांच्या व्हिडीओला चाहत्यांनी मोठा प्रतिसाद दिल्याचा दिसत आहे. अनेक मराठी चाहत्यांनी यावर कमेंट करत त्याला मोठा प्रतिसाद दिला आहे.

सुनील बर्वेच्या अमर फोटो स्टुडिओ नाटकानं घेतला अखेरचा निरोप

‘जय महाराष्ट्र’, अशी कमेंट एका यूजरने केली आहे. तर दुसऱ्या यूजरने “भाऊ तू आमच्या मराठी चाहत्यांना खुश केल्याबद्दल तुला प्रेमाचा जय महाराष्ट्र”, असे म्हटले आहे. ‘नीमा ताई तुम्ही फार छान डान्स केलात आणि किली भाऊ तुम्हीही’, अशी कमेंट यूजर्स करत आहेत. दरम्यान ‘महाराष्ट्र शाहीर’ सिनेमातील ‘बहरला हा मधुमास’ हे गाणं गुरू ठाकूर यांनी लिहिले आहे. अजय-अतुल यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं आहे तर प्रसिद्ध बॉलिवूड गायिका श्रेया घोषालने हे गाणं गायले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube