Download App

इंडियन पोस्ट पेमेंट बँकेत 132 पदांसाठी बंपर भरती, पगार महिन्याला 30,000 रुपये, जाणून घ्या निवड प्रक्रिया

  • Written By: Last Updated:

India Post Payments Bank Bharti 2023: बँकेत सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. इंडियन पोस्ट पेमेंट बँकेत (Indian Post Payments Bank) 132 पदांची भरती निघाली आहे. बँकेने अधिसूचना जारी करून कंत्राटी पद्धतीने भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. ज्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. 26 जुलैपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीअंतर्गत देशातील विविध राज्यांमध्ये एकूण 132 पदे भरली जाणार आहेत. उमेदवार 16 ऑगस्ट 2023 पर्यंत अर्ज करू शकतात. अर्ज फक्त ऑनलाइन स्वरूपात भरता येईल, इतर कोणतेही स्वरूप स्वीकारले जाणार नाही. (Bumper Recruitment for 132 Posts in Indian Post Payments Bank Salary Rs 30,000 per Month)

एकूण पदे– 132

श्रेणीनिहाय भरती:
सामान्य श्रेणी: 56 जागा
अनुसूचित जाती (SC): 19 जागा
अनुसूचित जमाती (ST): 9 जागा
ओबीसी – 35 जागा
आर्थिकदृष्ट्या कमकुवत विभागातील उमेदवार: 13 जागा

राज्यनिहाय भरती:
आसाम : 26
छत्तीसगड : 27
हिमाचल प्रदेश: 12
जम्मू आणि काश्मीर : 7
लडाख : 1
अरुणाचल प्रदेश: 10
मणिपूर : 9
मेघालय : 8
मिझोराम : 6
नागालँड : 9
त्रिपुरा: 5
उत्तराखंड : 12

शैक्षणिक पात्रता :
पोस्ट ग्रॅज्युएशन असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
तथापि, सध्या फायनान्स आणि सेल्समध्ये पदवीचे शिक्षण घेत असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.

नितीशकुमारांशी आमचे चांगले संबंध, ते कधीही आमच्यासोबत येऊ शकतात; आठवलेंचं मोठं विधान
वयोमर्यादा :
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय हे  21 वर्ष ते 35 वर्षांच्या दरम्यान असावे.
अधिकृत वेबसाइटला भेट देऊन उमेदवार या IPPB भरती वयोमर्यादेबद्दल अधिक तपशील तपासू शकतात.

अर्ज शुल्क:
SC, ST, PWD उमेदवारांना रु. 100 अर्ज फी भरावी लागेल.
त्याच वेळी, इतर प्रवर्गातील उमेदवारांना 300 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल.

पगार-
निवडलेल्या उमेदवारांना दरमहा 30,000 रुपये दिले जातील. याशिवाय निवड झालेल्या उमेदवारांना नियमांनुसार इतर भत्त्यांचाही लाभ मिळेल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 ऑगस्ट 2023

निवड प्रक्रिया-
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेतील कार्यकारी भरतीसाठी निवड प्रक्रियेदरम्यान उमेदवारांना ऑनलाइन चाचणी/गटचर्चा/वैयक्तिक मुलाखतीला उपस्थित राहावे लागेल. प्रक्रियेतील निवडलेल्या सर्व उमेदवारांची कार्यकारी पदासाठी निवड केली जाईल. ही भरती केवळ एका वर्षाच्या कालावधीसाठी कंत्राटी पद्धतीने केली जाणा आहे. उमेदवाराच्या कामगिरीनुसार हा कालावधी २ किंवा ३ वर्षांनी वाढवला जाईल.

जाहिरात–
https://ippbonline.com/documents/31498/132994/1690280273565.07.2023.pdf

अर्ज कसा करा:
सर्व उमेदवारांनी प्रथम अधिकृत वेबसाइटवर जा.
त्यानंतर रिक्रूटमेंट लिंकवर क्लिक करा.
त्यानंतर आपला वैयक्तिक तपशील भरून वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड तयार करा.
त्यानंतर एक फॉर्म ओपन होईल तो  फॉर्म भरा आणि सबमिट करा.
यानंतर, फॉर्मची एक प्रत डाउनलोड करून ती तुमच्याकडे ठेवा.

Tags

follow us