EMI on Home Loan : स्वतःचं हक्काचं अन् मालकीचं एक घर असावं असं प्रत्येकाचच स्वप्न असतं. जर एखादं घराचं बांधकाम होत आहे आणि या प्रॉपर्टीत गुंतवणूक (Property Investment) करताना तुम्ही बिल्डर किंवा बँकेशी चर्चा केली असेल तर त्यावेळी Full EMI आणि Pre EMI हे शब्द तुम्ही ऐकले असतीलच. आज या बातमीतून आम्ही तुम्हाला या दोघांतला फरक समजावून सांगणार आहोत.
Pre EMI बिल्डरला कर्जाचे पहिले पेमेंट मिळाल्याबरोबर सुरू होतो. ज्यावेळी तुम्ही प्री ईएमआय पर्याय घेता त्यावेळी घर तयार होण्याच्या आधारावर कर्ज विविध टप्प्यात विभागणी केली जाते. पण तुम्हाला मात्र दिलेल्या रकमेवर व्याज द्यावेच लागते. तसेच फूल रिपेमेंट तेव्हाच सुरू होईल ज्यावेळी तुम्हा प्रॉपर्टीचा ताबा घेताल.
कर्जाच्या हप्त्यात मुद्दल आणि व्याज या दोन्हींचाही समावेश असतो. बँकेकडून बिल्डरला ज्यावेळी पत्र आणि अमाउंट डिस्बर्स नंबर दिला जातो त्यावेळी तुमचा ईएमआय सुरू होतो. ज्यावेळी तुम्ही एखाद्या प्रॉपर्टीसाठी कर्ज घेता त्या प्रॉपर्टीचा ताबा घेतल्यानंतर मिळणाऱ्या ईएमआय मध्ये मुद्दल आणि व्याज या दोन्हींचा समावेश असतो. यालाच फुल ईएमआय म्हटले जाते.
अलर्ट ! 1 एप्रिलपासून ‘या’ मोबाईल नंबरच्या बँकिंग आणि UPI सेवा होणार बंद, कारण…
ईएमआय वर सिंपल इंटरेस्ट आकारला जातो. जर एखाद्याने 50 लाख रुपयांचे कर्ज घेतले असेल आणि घराचा ताबा मिळण्याआधी बिल्डरला पाच लाख रुपये मिळाले असतील. व्याज दर साडेसात टक्के असेल तर या पाच लाख रुपयांवर साडेसात टक्के व्याज असेल. म्हणजेच 37 हजार 500 रुपये. हीच रक्कम 12 महिन्यात विभागून दर महिन्याला 3125 रुपये इतका ईएमआय असेल.
या नंतर सहा महिन्यांनी पुन्हा बिल्डरला पाच लाख रुपयांचे पेमेंट मिळाले तर ईएमआय मध्ये 3125 रुपये आणखी वाढतील. म्हणजेच ईएमआय 6250 रुपये इतका होईल. जसजसे बिल्डरला पेमेंट होत राहील तसतसे पैसे ईएमआय मध्ये वाढत राहतील. प्री ईएमआय चा सर्वात मोठा तोटा म्हणजे कर्जदाराचे व्याज भरणा फुल ईएमआय पर्यायापेक्षा जास्त असेल. कर्जदाराला कर्जाचे हप्ते देखील दीर्घ काळ भरावे लागतात. तसेच कर्जदाराचे कर्ज अवधी प्रॉपर्टीचा ताबा घेतल्यानंतरच सुरू होईल.
मोबाइल बिलमुळेही क्रेडिट स्कोअर होऊ शकतो खराब; गणित समजून घ्याच!
कर्जाची पूर्ण रक्कम मिळाल्यानंतर सुरू होणाऱ्या ईएमआयला पूर्ण ईएमआय असे म्हणतात. यामध्ये व्याज आणि मुद्दल या दोन्ही रकमांचा समावेश असतो. जोपर्यंत संपूर्ण कर्जाची परतफेड होत नाही तोपर्यंत ईएमआय भरावे लागतात. घर किंवा एखाद्या प्रॉपर्टीचे निर्माण कार्य पूर्ण झाल्यानंतर हा ईएमआय सुरू होतो. या गोष्टी बँकांचे प्रतिनिधी शक्यतो ग्राहकांना सांगत नाहीत. त्यामुळे ग्राहकांची फसगत होते. काही वेळेस त्यांना विनाकारण जास्त पैसे भरावे लागतात. ग्राहकांच्या हिताचा विचार करून कर्जातील बारकावे बँका आणि वित्तीय संस्थांच्या प्रतिनिधींनी ग्राहकांना सांगणे आवश्यकच आहे.