Retirement Pension Plan : सेवानिवृत्तीनंतर पेन्शन हाच उत्पन्नाचा मुख्य स्रोत असतो. आपले उत्पन्न थांबू नये असे प्रत्येकालाच वाटत असते. यासाठी सध्याच्या परिस्थितीत अनेक रिटायरमेंट प्लॅन आहेत. यामध्ये अटल पेन्शन योजना आणि नॅशनल पेन्शन स्कीम या (National Pension Scheme) योजनांची नावे आघाडीवर आहेत. या दोन्ही योजना जास्त लोकप्रिय आहेत. या योजनांत गुंतवणूक (Investment) केल्यानंतर सेवा निवृत्तीनंतर चांगला परतावा देखील मिळतो. परंतु काही गोष्टीत या दोन्ही योजना भिन्न आहेत. त्यामुळे या दोन्ही योजनांत तुमच्यासाठी कोणती स्कीम फायदेशीर राहील याची माहिती घेऊ या..
केंद्र सरकारने सन 2004 मध्ये ही योजना सुरू (National Pension Scheme) केली होती. या योजनेत गुंतवणूकदाराला एक ठराविक रक्कम गुंतवावी लागते. या योजनेत फक्त भारतीय नागरिक सहभागी होऊ शकतात. लाभार्थ्यांचे वय 18 ते 55 वर्षांदरम्यान असावे. या योजनेचे नियंत्रण फंड विनियामक आणि विकास प्राधिकरणकडून केले जाते.
या योजनेत गुंतवणूकदाराला रिटायरमेंट अकाउंटमध्ये पैसे गुंतवणूक करावे लागतात. या योजनेत गुंतवणूकदार स्टॉक, सरकारी बाँड यांच्या आधारावर देखील पैसे गुंतवणूक करू शकतात. ही स्कीम शेअर मार्केटशी (Share Market) लिंक केलेली असते. गुंतवणूकदाराने ज्यात गुंतवणूक केली आहे त्याच्या कामगिरीच्या आधारावर लाभ मिळेल.
पीएफ खातेदारांसाठी गुडन्यूज! ठेवींवरील व्याजदराबाबत मोठा निर्णय; किती मिळणार व्याज, वाचा..
एनपीएस शेअर बाजार लिंक योजना आहे
या योजनेला इक्विटी, सरकारी प्रतिभूती आणि कॉर्पोरेट बाँडच्या रूपात सादर केले जाते.
या योजनेत पैसे गुंतवणुकीची कमाल मर्यादा नाही
गुंतवणूकदार अंशदान आणि इन्व्हेस्टमेंट रिटर्न आधारावर पेन्शन मिळण्यास पात्र ठरतो.
या योजनेत सरकारकडून कोणतेही योगदान दिले जात नाही.
या योजनेत नॉमिनी असणे अनिवार्य आहे.
केंद्र सरकारने पेन्शन प्रोग्राम अंतर्गत अटल पेन्शन योजना सुरू (Atal Pension Scheme) केली आहे. सन 2015 मध्ये ही योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेत भारतीय नागरिकांसह अनिवासी भारतीय देखील गुंतवणूक करू शकतात. ही एक गॅरंटी पेन्शन स्कीम आहे. म्हणजेच यामध्ये हमखास पेन्शन मिळते. ग्राहक कोणत्या वयात आणि किती पैसे गुंतवणूक करतात यावर पेन्शन किती मिळेल याचे गणित ठरते. या योजनेत 18 ते 40 वर्षे वयोगटातील नागरिक सहभागी होऊ शकतात. कमीत कमी वीस वर्षांपर्यंत पैसे गुंतवणूक करू शकतात.
इडली आवडीने खाताय? पण होऊ शकतो कॅन्सर; कर्नाटकात ‘इडली’ फेल, काय घडलं?
या योजनेत सेवानिवृत्तीनंतर हमखास पेन्शनचा लाभ मिळतो.
या योजनेत दरमहा पाच हजार रुपये गुंतवणूक करू शकता.
या योजनेत 1 हजार रुपयांपासून ते 5 हजार रुपयांपर्यंत दरमहा पेन्शन मिळते.
या योजनेत गुंतवणूकदाराला पर्मनंट रिटायरमेंट अकाउंट नंबर (PRAN) मिळत नाही.
सरकारी नियम आणि अटींचा विचार करून निश्चित रक्कम दिली जाते.
या योजनेत वारसदाराचे नाव देणे बंधनकारक आहे.