Download App

Railway Recruitment: रेल्वे विभागात 2,424 पदांसाठी भरती सुरू, कोण करू शकतं अर्ज?

ध्य रेल्वेने शिकाऊ पदांच्या (Apprenticeships) रिक्त जागांसाठी अधिसूचना जारी केली आहे. या भरती अंतर्गत 2,424 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

  • Written By: Last Updated:

Central Railway Apprentice Recruitment 2024: रेल्वेमध्ये नोकरी (Job Railways) करण्याचं स्पप्न पाहणाऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे, नुकतीच मध्य रेल्वेने शिकाऊ पदांच्या (Apprenticeships) रिक्त जागांसाठी अधिसूचना जारी केली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार मध्य रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट rrccr.com वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरती अंतर्गत 2,424 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. दरम्यान, या भरतीसाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता काय आहे? अर्ज करण्याची अंतिम तारीख किती आहे? याच विषयी जाणू घेऊ.

Laxman Hake : आता आरक्षण वाचवायला फुले-शाहू-आंबेडकर येणार नाहीत… 

भारतीय रेल्वेचा विस्तार लक्षात घेता त्यासाठी कुशल आणि अकुशल कामगारांची गरज आहे. तांत्रिक ज्ञान असणाऱ्यांना विशेष मागणी आहे. हे लक्षात घेऊन मध्य रेल्वे शिकाऊ पदांच्या रिक्त जागांसाठी भरती सुरू केली. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

एकून पदे – 2,424 रिक्त जागा

शैक्षणिक पात्रता
मध्य रेल्वेत शिकाऊ पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून किमान 50% गुणांसह 10वी किंवा 12वी उत्तीर्ण केलेली असावी. शिवाय, त्याच्याकडे राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र देखील असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा –

या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 15 ते 24 वर्षांच्या दरम्यान असावे. महत्वाचं म्हणजे, मागास प्रवर्गातील उमेदवारंना वयाोमर्यायदेत सवलत दिली आहे. SC/ST उमदेवारांना 5 वर्षे तर OBC उमेदवारांना 3 वर्षांची सूट देण्यात आली आहे.

उमेदवार या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज भरण्याची प्रक्रिया 16 जुलैपासून सुरू झाली असून 15 ऑगस्ट 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
रविकांत तुपकरांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी, शिस्तभंग समितीची मोठी कारवाई

अर्ज फी –

अर्जाची फी 100 रुपये आहे. उमेदवारांना आपली फी ऑनलाईन पध्दतीने भरावी लागले. अर्ज भरताना स्क्रीनवर विचारल्याप्रमाणे डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड/इंटरनेट बँकिंग/SBI इत्यादी वापरून पेमेंट केले जाऊ शकते. SC/ST/PWD आणि महिला उमेदवारांना शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.

उमेदवारांची निवड कशी केली जाईल?
उमेदवारांची निवड गुणवत्ता यादीच्या आधारे केली जाईल. मॅट्रिक आणि आयटीआय या दोन्ही परीक्षांमधील उमेदवारांनी मिळवलेल्या टक्केवारीतील गुणांची सरासरी घेऊन गुणवत्ता यादी तयार केली जाईल. ज्या उमेदवारांची नावे गुणवत्ता यादीत असतील त्यांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले जाईल.

अधिसूचना –

https://rrccr.com/rrwc/Files/be2a1bd2-2e6a-4ce1-ba0b-82dd736d7ae9.pdf

follow us