Download App

वन्यप्राण्यांकडून शेतीचे नुकसान झाल्यास शेतकऱ्याला नुकसान भरपाई

LetsUpp | Govt.Schemes
राज्यातील रानडुक्कर(wild boar), हरिण, (सारंग व कुरंग), रानगवा, रोही (निलगाय), माकड, वानर तसेच वन्यहत्ती या वन्यप्राण्यांपासून (wild animals)मनुष्य, पशुधन, शेतपिकाला किंवा फळबागांना नुकसान (Damage to orchards)झाल्यास नुकसान भरपाई (compensation for damages)देण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली.

R Madhavan birthday: आर. माधव कोल्हापुरच्या मुलीच्या प्रेमात कसा पडला; घ्या जाणून Love Story

योजनेच्या प्रमुख अटी :
1. पीक नुकसानीची तक्रार नजीकचे वनरक्षक, वनपाल अगर वनपरिक्षेत्राधिकारी यांचेकडे घटना घडल्यापासून तीन दिवसांत करावी.
2. पीक नुकसानीबाबतची शहानिशा संबंधित वनपाल, संरपंच, व ग्रामसेवक / तलाठी या तीन सदस्यांच्या समितीमाफर्त 10 दिवसांच्या आत करावी.

आवश्यक कागदपत्रे : पीक नुकसान झालेल्या क्षेत्राचा पंचनामा, मोजणी व नुकसानीबाबतच्या पुराव्याची कागदपत्रे.

लाभाचे स्वरूप असे : शासन निर्णयानुसार वन्यप्राण्यांपासून झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात येते.

या ठिकाणी संपर्क साधावा : संबंधित क्षेत्रातील उपवनसंरक्षक / उप विभागीय अधिकारी / वन क्षेत्रपाल यांचे कार्यालय

संकेतस्थळ : mahaforest.nic.in

(टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.)

Tags

follow us