Download App

‘अजून एक जमताडा’; ऑनलाईन गंडा घालणारा मोठा अड्डा उद्धवस्त

Cyber Crime: हरियाणातील नूह जिल्ह्यात पसरलेल्या सायबर गुन्ह्यांविरोधात (Cyber ​​criminal) हरियाणा पोलिसांनी (Haryana Police) मोठी मोहीम राबवून वेगवान कारवाई केली आहे. 5000 हून अधिक पोलिस आणि अधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या पथकांनी गुरुवारी रात्री उशिरा नूह जिल्ह्यातील 14 गावांमध्ये एकाच वेळी छापे टाकले आणि 125 हॅकर्स आणि सायबर गुन्हेगारांना अटक केली.

त्यांच्याकडून विविध बँकांचे एटीएम, स्मार्टफोन, लॅपटॉप, आधार कार्ड, एटीएम स्वाइप मशीनसह इतर वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. या संशयितांना अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे.

हरियाणा पोलिसांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांत पोलिसांना नूह जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात सायबर फसवणुकीशी संबंधित इनपुट मिळाले होते. काही लोक खोलीत बसून इतरांची बँक खाती लुटत होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे, सायबर क्राईम हॉटस्पॉट क्षेत्रे ओळखण्यात आली आणि या ठिकाणी एकाच वेळी मोठ्या पोलीस बंदोबस्तासह छापे टाकण्यात आले.

Kangana Ranaut: ‘ती’ गोष्ट बेडरूमपर्यंतच ठेवा; कंगना रनौतचे मोठं गौप्यस्फोट; ट्वीट करत म्हणाली…

ही कारवाई करण्यासाठी, हरियाणा पोलिसांनी 5000 हून अधिक पोलिसांची स्वतंत्र टीम तयार केली, ज्यामध्ये 1 एसपी, 6 अतिरिक्त एसपी, 14 डीएसपी आणि इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी सायबर क्राईमविरोधात मोहीम सुरू केली.

भोंडसी येथे 4 एप्रिल ते 8 एप्रिल या कालावधीत झालेल्या सायबर प्रशिक्षण कार्यक्रमानंतर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरूनच नुह येथील सायबर ठगांवर कारवाई करण्यासाठी या विशेष मोहिमेची रूपरेषा तयार करण्यात आली असल्याचे एसपी नुह वरुण सिंगला यांनी सांगितले. जिल्ह्यातील सायबर क्राईमचे हॉटस्पॉट समजल्या जाणाऱ्या 14 गावांचे मॅपिंग करून पोलिसांनी प्रथम लक्ष्य निश्चित केले.

कपडे फाडण्याच्या नादात तुम्ही स्वत:ला फाडून घ्याल, नितेश राणेंवर कोणाचा निशाणा?

अटक करण्यात आलेल्या गुन्हेगार आणि हॅकर्सकडून एकूण 66 स्मार्टफोन, 65 बनावट सिम, 166 आधार कार्ड, 3 लॅपटॉप, 128 विविध बँकांचे एटीएम कार्ड, 2 एटीएम स्वाइप मशीन, 1 एईपीएस मशीन, 6 स्कॅनर, 5 पॅन कार्ड जप्त करण्यात आले आहेत. आरोपींकडून 7 देशी बनावटीचे पिस्तूल, 2 काडतुसे, 2 कार, 4 ट्रॅक्टर-ट्रॉली, 22 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. सायबर आणि इतर गुन्हेगारी प्रकरणात सहभागी असलेल्या 69 आरोपींना लक्ष्य करून पोलिसांनी छापे टाकले.

Tags

follow us