कपडे फाडण्याच्या नादात तुम्ही स्वत:ला फाडून घ्याल, नितेश राणेंवर कोणाचा निशाणा?
भाजप आमदार नितेश राणे तुम्ही कपडे फाडण्याच्या नादात स्वत:चे कपडे फाडून घ्याल, या शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे नेते, युवासेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी नितेश राणे यांचा समाचार घेतला आहे. दरम्यान, निलेश राणे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत भाजपच्या नेत्यांवर बोलल्यास आम्ही उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंना सोडणार नसल्याचं भाष्य केलं होतं. त्यावर आता शरद कोळी यांनी प्रत्युत्तर दिलंय.
गृहयुद्धांचा सुदान ! 68 वर्षांत गेला 28 लाख लोकांचा बळी; जाणून घ्या, युद्धांचा इतिहास
कोळी पुढे बोलताना म्हणाले, नितेश राणेंना सत्तेचा माज आणि मस्ती बरोबर नाही. तुम्हाला डोक्याचा भाग आहे का पिसाळलेलं कुत्र चावलंय, की तुम्हाला वेड तर लागलं नाही ना? पिसाळलेली कुत्री, माणसं कपडे कोण फाडतात. ती माणसं स्वत: ला मारुन घेत असतात. तुमच्या डोक्यावर परिणाम झाला असेल तर सांगा तुम्हाला पुण्याच्या रुग्णालायत भरती करतो त्याचा खर्च शिवसेना करेन, या शब्दांत कोळी यांनी समाचार घेतला आहे.
मनीष सिसोदियांना मोठा झटका; न्यायालयाने जामीन फेटाळला
आता तुम्हीच सांगा तुम्ही नेमकं कुत्रा आहे का पिसाळलेला माणूस आहे? असा सवाल करीत थेट नितेश राणेंना कोळी यांनी डिवचलं आहे. राणे तुम्हाला गुर्मी आलीय, तुम्ही तसं वागू नका, तुम्हालाच आरंतुरं बोलता येतं का? यापुढे संजय राऊत उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंसह शिवसेनेच्या कोणत्याही नेत्यांना अरेरावीची भाषा केली तर आम्हालाही खालची भाषा येते, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.
दरम्यान, आज सत्ता भाजपची आहे म्हणून मस्ती करू नका, उद्या आमची सत्ता आल्यावर तुमच्या पायाखालची वाळू सरकेल, असा इशारा शरद कोळी यांनी नितेश राणे यांना दिला आहे.