जगात लवकरच ‘एआय त्सुनामी’ ; जीवन कसे बदलले, Anthropic CEO ने A टू Z सांगितलं

Dario Amodei : व्यापार क्षेत्रासह, वैद्यकीय क्षेत्र असू किंवा दैनंदिन आयुष्य आज एआयने जबरदस्त झेप घेतली असून अनेक कामात एआय मदत करताना

Dario Amodei

Dario Amodei

Dario Amodei : व्यापार क्षेत्रासह, वैद्यकीय क्षेत्र असू किंवा दैनंदिन आयुष्य आज एआयने जबरदस्त झेप घेतली असून अनेक कामात एआय मदत करताना दिसतेय. तर आता जगात लवकरच आर्टिफिशियल इंटेलिजेंसची त्सुनामाी येणार असल्याचं सांगण्यात येतेय. याबाबत अँथ्रोपिकचे सीईओ डारियो अमोदेई यांनी जगाला इशारा दिलाय. एआय त्सुनामी येत आहे, पण त्यासाठी संपूर्ण जग तयार नाही असं ते निखिल कामथ (Nikhil Kamath) यांच्या पॉडकास्टवर बोलताना म्हणाले.

पॉडकास्टमध्ये त्यांनी म्हटले की, लोक एआयचा प्रभाव त्यांच्या डोळ्यांसमोर पाहत आहेत मात्र तरीही यासाठी तयारी करताना दिसत नाही. एआय आता आर्थिक आणि जागतिक बदल घडवून आणत आहेत जे संपूर्ण जगाला बदलून टाकतील. ज्या तंत्रज्ञानाला आपण एकेकाळी खेळणी किंवा लहान साधन मानत होतो ते आता सरकार आणि अर्थव्यवस्थांना अडथळा आणू शकणारी शक्ती बनली आहे.

कोडिंग आणि रिसर्चवर एआयचा ताबा

नोकऱ्या आणि कामाच्या पद्धतींचा विचार केला तर अमोदेई (Dario Amodei) यांचे विश्लेषण सखोल दिसतेय. एआयचा प्रत्येक कामावर सारखाच परिणाम होणार नाही. मानवी संवाद आणि भावनांवर अवलंबून असलेल्या नोकऱ्यांना बदलण्यासाठी वेळ लागेल. परंतु कोडिंग, गणित आणि वैज्ञानिक रिसर्च यासारख्या क्षेत्रात चित्र आधीच बदललं आहे. आज, एआय सिस्टम (AI tsunami) ही जटिल कामे स्वतःहून हाताळत आहेत. सॉफ्टवेअर अभियांत्रिकीच्या जगात, एआय आता केवळ मदत देत नाही, तर कामाचा एक महत्त्वाचा भाग स्वतःच करत आहे. अमोदेईचा असा विश्वास आहे की, संपूर्ण सॉफ्टवेअर अभियांत्रिकी प्रक्रियेचे ऑटोमेशन जगाच्या अपेक्षेपेक्षा लवकर होऊ शकते.

डेटा आणि सिंथेटिक जगाचा नवीन खेळ काय?

आतापर्यंत एआयला चालविण्यासाठी भरपूर डेटा आवश्यक आहे असं मानले जात होते मात्र अमोदेई म्हणतात की, एआय मॉडेल्सना आता बाह्य डेटाची आवश्यकता नाही. जेव्हा एआयला गणित किंवा कोडिंग शिकवले जाते तेव्हा ते स्वतःचा डेटा तयार करते. याला “सिंथेटिक डेटा” म्हणतात. म्हणजेच, मॉडेल आता स्वतःचा डेटा तयार करत आहे आणि त्यातून शिकत आहे. हा बदल एआयच्या प्रगतीला आणखी गती देत आहे कारण मानवी जगाकडून शिकण्यासाठी डेटावर अवलंबून राहणे कमी होत आहे. हा गतिमान डेटा भविष्यातील एआयचे खरे इंजिन असणार आहे.

रात्री वाय-फाय आणि मोबाइल इंटरनेट बंद का करावे? विज्ञान काय म्हणतो जाणून घ्या-

रोगांवर उपचार आणि भविष्यासाठी जबाबदारी

एआयच्या गंभीर इशाऱ्यांमध्ये काही फायदे देखील असल्याचे अमोदेई यांनी सांगितले आहे. एआयच्या मदतीने, आपल्याला लवकरच अनेक असाध्य रोगांवर उपचार सापडतील. हे तंत्रज्ञान केवळ भीतीसाठी नाही तर मानवतेच्या कल्याणासाठी देखील वापरता येणार असून पण इतक्या मोठ्या शक्तीसोबत जबाबदारी येते. एआयचा विकास काळजीपूर्वक आणि योग्य नियमांनुसार केला पाहिजे. जर प्रशासन आणि नियम नसतील तर ही त्सुनामी चांगल्यापेक्षा जास्त नुकसान करू शकते असा इशारा या पॉडकास्टमध्ये बोलताना अमोदेई म्हणाले.

Exit mobile version