Download App

Viral Video : शाहरूखच्या ‘झूमे जो पठान’ गाण्यावर शिक्षिकेने विद्यार्थ्यांबरोबर केला डान्स; सोशल मीडियावर कमेंटचा पाऊस

Viral Video : बॉलिवूडचा किंग खान म्हटला जाणारा अभिनेता शाहरुख खानचा (Actor Shahrukh Khan) नुकताच प्रदर्शित झालेला ‘पठाण’ (Pathan) चित्रपट बराच काळ वादात राहिला. प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाने कमाईचे सर्व रेकॉर्ड तोडले. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्याच्या चाहत्यांचे शाहरुख खानवरील प्रेम. त्याचबरोबर या चित्रपटाची क्रेझ आता लोकांच्या हृदयावर आणि मनावरही व्यापली.


यामुळेच सोशल मीडियावर (Social Media) या चित्रपटाच्या ‘झूम जो पठाण’ या हिट टायटल ट्रॅकवर लोक व्हिडिओ बनवताना दिसतात. (Viral Video) सध्या सोशल मीडियावरून शाहरुखच्या चित्रपटातील ‘झूम जो पठाण’ या गाण्याची झलक सर्वत्र ऐकू येत आहे. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक विद्यार्थ्यांसोबत डान्स करताना दिसत आहेत.

विद्यार्थ्यासोबत केला डान्स

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली युनिव्हर्सिटीच्या (Delhi University) ‘जिसस अँड मेरी कॉलेज’मधील एका कार्यक्रमादरम्यान, अभिनेता शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटातील हिट गाण्यावर महिला प्राध्यापिका विद्यार्थ्यांसोबत जोरदार डान्स करताना दिसल्या. यावेळी प्राध्यापकांची मस्त स्टाइल पाहून सर्वजण थक्क झाले. डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स JMC नावाच्या इंस्टाग्राम पेजवर सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करण्यात आला. व्हिडिओमध्ये अनेक महिला प्राध्यापक डान्स करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर पिवळी साडी नेसलेल्या एका प्रोफेसरने गाण्यावर तिच्या उत्तम डान्स मूव्ह दाखवल्या आहेत.

व्हिडिओला 13 लाख व्ह्यूज

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर 13 लाखांहून अधिक व्ह्यूज आणि 1 लाख 18 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. त्याच वेळी, मोठ्या संख्येने वापरकर्ते या व्हिडिओवर कमेंट करताना आणि त्यांच्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिले की, ‘आम्हीही अशा प्रोफेसरला पात्र आहोत’. दुसर्‍याने कमेंट करत लिहिले, ‘पिवळ्या साडीत बाईने पावले टाकली आहेत, बाकीचे हवेत उड्या मारत आहेत.’

Tags

follow us