Download App

Diwali 2023 : …म्हणून दिवाळीच्या पाडव्याला ‘बलिप्रतिपदा’ही म्हणतात

  • Written By: Last Updated:

Diwali 2023 : दिवाळी या पाच दिवसांच्या सणामधील पाचवा दिवस म्हणजे पाडवा किंवा बलिप्रतिपदा होय. हा दिवस म्हणजे हिंदू पंचांगप्रमाणे साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहुर्त मानला जातो. या दिवशी नव्या वस्तू, शुभ कार्य आणि सोने खरेदीला विशेष महत्त्व असतं. त्यामुळ जाणून घेऊ दिवाळीच्या पाडव्याचं पौराणिक महत्त्व आणि त्याला बलिप्रतिपदा का म्हणतात?

…म्हणून दिवाळीच्या पाडव्याला ‘बलिप्रतिपदा’ही म्हणतात

दिवाळीच्या पाडव्याला ‘बलिप्रतिपदा’ही म्हणतात कारण बळी हा राक्षसांचा राजा होता. तसेच तो शेतकऱ्यांचा राजा होता. म्हणूनच शेतकऱ्याला बळीराजा म्हटलं जात. ज्यावेळी विष्णूने वामन अवतारामध्ये या बळीवर विजय मिळवला. त्यावेळी वामनाने बळीला केवळ तीन पायरी जमीन मागितली. मात्र बळीच्या गर्व हरणासाठी वामनाने दोन पावलात पृथ्वी आणि ब्रम्हांड व्यापले. तेव्हा तिसरा पाय कुठे ठेवावा तेव्हा बळीने आपले डोके पुढे केले तेव्हा बळा राजा स्वर्ग लोकांत गेला.

Uddhav Thackeray : ‘हिंमत असेल तर पोलीस बाजूला ठेवून आम्हाला भिडा’; उद्धव ठाकरेंचं शिंदेंना आव्हान

त्यावेळी याच दिवशी राजा बळीला भगवान विष्णूंकडून अमर होण्याचं वरदान मिळालं होतं. तसेच बलिप्रतिपदेच्या दिवशी राजा बळी पृथ्वीवर येतो आणि त्याच्या भक्तांची हाक ऐकतो. असं मानलं जात. तर द्वापार युगात भगवान श्रीकृष्ण दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी प्रतिपदेला गोवर्धन पर्वताची पूजा करत असत. त्यामुळे या दिवशी अनेक ठिकाणी दारापुढे शेणाच्या गोवर्धनाची प्रतिकृती बनवण्याची देखील प्रथा असते.

Naresh Mhaske : ‘राऊतांनाच CM व्हायचं होतं, बैठकाही घेतल्या’; म्हस्केंचा दावा

या दिवशी देखील अभ्यंग स्नानला महत्त्व आहे. तर ज्या प्रमाणे भाऊबीजेला बहिणने भावाला औक्षण करण्याची पद्धत आहे. तशीच पाडव्याला पत्नी पतीला औक्षण करते. पतीकडून पत्नीला खास भेटवस्तू देखील दिल्या जातात. या दिवशी नव्या वस्तू, शुभ कार्य आणि सोने खरेदीला विशेष महत्त्व असतं. तसेच दसऱ्या प्रमाणे आजही पाटी सरस्वती किंवा वहि पुजन केलं जातं. याला व्यापारी आणि उत्तर भारतात जास्त महत्त्व आहे. अशा या पाडव्याला म्हणजेच बलिप्रतिपदेनिमित्त शेतकऱ्यांना आपल्या बळीराजाला सुखाचे दिवस येवोत अशा शुभेच्छा देऊयात…

follow us