Employees Provident Fund Organization Recruitment : तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत 12 वी उत्तीर्ण आणि पदवीधारकांसाठी नोकरी करण्याची संधी चालून आली आहे. EPFO च्या अधिकृत संकेतस्थळावर 2800 हून अधिक रिक्त जागांची बंपर भरती जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार, सामाजिक सुरक्षा सहाय्यक आणि स्टेनोग्राफर पदाच्या एकून 2859 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. तुम्ही या भरतीसाठी अर्ज करायला इच्छुक असाल तर अजिबात वेळ न घालवता लगेच अर्च करू शकता. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 26 एप्रिल 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत.
या भरतीसाठी आवश्यक वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, अर्ज फी, निवड प्रक्रिया याबाबतची माहिती अधिकृत माहिती संस्थेने प्रकाशित केलेल्या नोटिफिकेशनमध्ये दिलेली आहे. कर्मचारी भविष्य निधी संस्थेतील या भरतीसाठी उमेदवार हे ऑनलाईन रितीने अर्ज करू शकतात. त्यासाठी उमेदवारांना EPFO च्या अधिकृत वेबसाईटला भेट देणं आवश्यक आहे.
एकून रिक्त जागा – 2859
पदाचे नाव –
सामाजिक सुरक्षा सहाय्यक (2674)
स्टेनोग्राफर (185)
शैक्षणिक पात्रता –
पद क्र. 1 साठी कोणत्याही शाखेतील पदवी
संगणकावर इंग्रजी टायपिंग – 35 श.प्र. मि.
पद क्र. 2 साठी 10 वी उत्तीर्ण असणं आवश्यक
कौशल्य चाचणी
नियम – डिक्टेसन : 10 मिनिटे
लिप्यंतरण – संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी)
किंवा 65 मिनिटे (हिंदी)
वयोमर्यादा –
ईपीएफओ पदांसाठी अर्ज करण्यासाठी (जनरल) उमेदवाराचं वय हे 18 ते 27 वर्ष दरम्यान असावं. आरक्षित वर्गाला (SC/ST/OBC) सरकारी नियमानुसाह, वयात 3 वर्षाची सवलत दिली जाणार आहे.
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना त्रास देण्यासाठी पोलिसांचा वापर; आव्हाडांची टीका
शुल्क –
जनरल/ OBC/ EWS – 700 रूपये
SC/ST/PWD महिलांना शुल्क नाही
निवड प्रक्रिया –
या पदासाठी उमेदवारांची निवड ही लेखी टेस्ट, टायपिंग चाचणी आणि स्टेनो कौशल्या चाचणीच्चया आधारे केली जाणार आहे.
पगार –
सामाजिक सुरक्षा सहाय्यक – 29 हजार 200 ते 92 हजार 300 रुपये
स्टेनोग्राफर – 29 हजार 500 ते 81 हजार 100
जाहिरात – https://www.epfindia.gov.in/
अर्ज करण्यासाठी लिंक –
https://recruitment.nta.nic.
● अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 एप्रिल 2023
● अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील संकेतस्थळाला भेट द्या – epfindia.gov.in