राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना त्रास देण्यासाठी पोलिसांचा वापर; आव्हाडांची टीका

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना त्रास देण्यासाठी पोलिसांचा वापर; आव्हाडांची टीका

Jitendra Awhad On Thane police : गेल्या काही दिवसांत अनेक राजकीय नेत्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळं राज्यात कायदा आणि सुव्यवस्था (Law and order) उरली नाही, अशी परिस्थिती आहे. नुकताच ठाण्यात ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांच्यावर जोरदार हल्ला झाला होता. शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर हा जीवघेणा हल्ला केला, असा आरोप रोशनी शिंदे यांनी केला होता. मात्र, पोलिसांनी रोशनी शिंदे यांची तक्रार न नोंदवता उलट रोशनी शिंदे यांच्यावरच गुन्हे नोंदवले होते. दरम्यान, आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी पोलिस यंत्रणा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (NCP) कार्यकर्त्यांना तंग करण्यासाठी वापरण्यात येत आहे, असा आरोप केला.

राज्यात झालेल्या सत्ताबदलानंतर राजकीय वातावरण हे गढूळ झालं आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत होत्या. आता तर प्रकरण जीवे घेण्यापर्यंत गेलं आहे. पोलिस यंत्रणांचा सरकार चुकीच्या पद्धतीने वापर करत आहे, अशी विरोधकांकडून टीका होत असते. काहीच दिवसांपूर्वी रोशनी शिंदे यांच्यावर झालेल्या हल्ल्याची पोलिसांनी तक्रार नोंदवली नव्हती. उलट रोशनी यांच्यावरच गुन्हे नोंदवले होते. त्यामुळं ठाकरे गट आक्रमक झाला होता. त्यांनी पोलीस आयुक्तांच्या कार्यालयावर मोर्चा काढत पोलिस निपक्षपातीपणा करत असल्याची टीका केली होता. त्यानंतर आता जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत पोलिसांच्या कार्यपध्दीवर ताशेरे ओढले.

आव्हाड यांनी ट्विट करत पोलिसांवर टीका केली. त्यांनी ट्विट करत लिहिलं की, ठाणे जिल्ह्यातील पोलिस यंत्रणा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना तंग करण्यासाठी वापरण्यात येत आहे. नवी मुंबईत अनु आंग्रे, तर ठाण्यात विक्रम खामकर, हेमंत वाणी, अभिजीत पवार, विशाल गायकवाड या सगळ्यांना तडीपार करण्याच्या कारवाईला देखील सुरूवता झाली आहे. मला देखील येन-केन प्रकारे गुंतवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तुम्हाला 10-15 वर्षे शिक्षा होईल. तुम्ही कशाला स्वत:चा जीव अडचणीत आणताय. तुम्ही जितेंद्र आव्हाड यांचे नाव सांगून टाका. सर्व साक्षीदारांना ज्यांनी 3 वर्षांपूर्वीचा आरोपी झालेले आहेत. आण ज्यांची चार्जशीट देखील कोर्टात गेलेली आहे. त्यांना घाबरण्याचे पूर्ण प्रयत्न पूर्ण आहेत, असं आव्हाड म्हणाले.

आव्हाड म्हणतात की, ते काय साध्य करू इछ्ति आहेत, हे देवास ठाऊक. तुम्हाला फाशी होईल. 10-15 वर्ष जेल होईल. हे कुठल्या कायद्यान्वये होईल, हे त्यांच त्यांना माहित. पण, सुप्रीम कोर्टाने फेर तपासणीची मागणी नाकारली आहे. आणि पुढील तपासाचे आदेश दिले. पुढील तपास म्हणजे, तुमच्या हातात नवीन काही लागले आहे का? त्याच्यावर तपास करा आणि त्या संबंधित लोकांवर तपास करा. तुम्ही सगळ्यांनाच बोलावून तपास करणं हे कायद्याला धरून नाही. पण, ठाणे पोलिस कायद्याला जुमानत नाहीत.

त्यांनी पुढं लिहिलं की, आनंद परांजपे यांच्यावर देखील अनेक केसेस टाकण्यात आल्या. तसेच ठाकरे गटाची कार्यकर्ती रोशनी शिंदे प्रकरण अगदीच किळसवाणे होते. तिला माता होण्यापासून रोखण्यापर्यंत मजल गेली. पण, पोलीस मात्र कारवाई करायची हिम्मतच दाखवत नाहीत. उलट तिच्यावरच गुन्हा दाखल झाला. तसेच ठाकरे गटाची स्मिता आंग्रे या कार्यकर्तीला देखिल दम दिला आणि तिच्या तक्रारीची दखल सुध्दा घेतली नाही. स्वप्नील कोळी ह्या कॉंग्रेसच्या कार्यकर्त्याला कोळीवाड्यात जाऊन पाहणी केली.

आदिती तटकरे ही शेंबडी : आमदार थोरवे बरळले, राष्ट्रवादी आक्रमक

गेले 6 महिने महापालिका प्रशासनाचा वापर करून अनधिकृत बांधकामाचे तो थोर सहाय्यक आयुक्त यांचा वापर करून अनेकांना गुडघ्यावर बसवण्याचे काम केले. अनेकांवर केसेस दाखल केल्या. कित्येकांवर गोळीबार झाले. परंतु, केसेस घ्यायला कुणीही तयार नाही, असं आव्हाड म्हणाले.

आव्हाड यांनी सांगितलं की, अशा या परिस्थितीत पोलीस प्रशासन असो नाहीतर महापालिका प्रशासन असो यांचा पूर्णपणे वापर करून राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस तसेच ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना संपवण्याच्या उद्देशाने त्यांना वापरलं जातं आहे. पण हे दिवास्पप्न बघू नका. पोलिसांनी स्वत:ला थोडा आवर घालावा, अन्यथा स्फोटक परिस्थिती होईल. मला एकच माहिती आहे, लढेगा साला… मरेगा नही, असा इशारा दिला.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube