आदिती तटकरे ही शेंबडी : आमदार थोरवे बरळले, राष्ट्रवादी आक्रमक

  • Written By: Published:
Untitled Design

MAL Mahendra Thorve On Aditi Tatkare : शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी रायगडच्या माजी पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.आमदार महेंद्र थोरवे यांनी एका कार्यक्रमात आदिती तटकरे यांचा शेंबडी म्हणून उल्लेख केला.

रायगडमध्ये शिवसेनेचे तीन तीन आमदार असून देखील एका शेंबडी मुलीला पालकमंत्री पद दिल होतं. असं वक्तव्य आमदार थोरवे यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्याचा राष्ट्रवादीकडून निषेध व्यक्त करण्यात आला. आमदार महेंद्र थोरवे यांनी आदिती तटकरे यांची माफी मागावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडलं जाणार असल्याचं राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांनी सांगितलं आहे.

PM PHOTO : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कॅमेरासोबत हटके लूक 

तसेच जर माफी मागितली नाही तर त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करत संपूर्ण राष्ट्रवादी रस्त्यावर उतरून रास्ता रोको करणार असल्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.

Tags

follow us