Download App

जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियात नोकरीची संधी, महिन्याला ५० हजाराहून अधिक पगार, कोण करू शकतं अर्ज?

  • Written By: Last Updated:

GIC Recruitment 2023 : आज अनेकजण चांगल्या नोकरीच्या (Job) शोधात आहेत. दरम्यान, तुम्ही पदवीधर असाल तर तुमच्यासाठी उत्तम नोकरीची संधी आहे. (General Insurance Corporation of India) ‘जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ अंतर्गत भरती सुरू आहे. या भरतीमध्ये मुख्य वित्त अधिकारी (chief Finance Officer) पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

मुंबई, उत्तर प्रदेश मजबूत झाल्यानंतर देश मजबूत होणार नाही का? उद्धव ठाकरेंचा मोदींना सवाल 

नुकतीच ‘जीआयसी’ने यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावा लागेल आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2023 आहे. दरम्यान, या भरतीसाठी लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा याबद्दलचे तपशील जाणून घेऊ.

एकूण पदे -१

पदाच नाव – मुख्य वित्त अधिकारी

शैक्षणिक पात्रता: पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता असून उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असावा. सीए म्हणजेच चार्टर्ड अकाउंटंट परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांना प्राधान्य दिले जाईल. तसेच उमेदवार हा इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया ‘ICAI’ चा सदस्य असावा. याशिवाय अधिसूचनेत तपशीलवार पात्रता नमूद करण्यात आली आहे. अधिसूचना वाचण्यासाठी त्याची लिंक खाली दिली आहे.

नोकरी ठिकाण: मुंबई

वयोमर्यादा: किमान ४५ वर्षे ते कमाल ५५ वर्षे

नागरिकांनो काळजी घ्या, राज्यात JN.1 व्हेरियंटचे 10 रुग्ण, पुण्यात दोन रुग्णांची नोंद 

अर्ज पद्धत: ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 डिसेंबर 2023

जाहिरात-
https://drive.google.com/file/d/1aqMSh6ceXX8eCfTfTRMjqfJ1mkFSMAu_/view

अर्ज प्रक्रिया: या भरतीसाठी ऑनलाइन माध्यमातून अर्ज करावा लागेल. अर्ज अंतिम तारखेपूर्वी म्हणजेच 26 डिसेंबर 2023 पूर्वी सबमिट करणे आवश्यक आहे. उशीरा आणि अपूर्ण अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी सूचना काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

याशिवाय, स्केल I अधिकारी पदांचीही भरती करण्यात येत आहे. संबंधित पात्रता असलेला कोणताही उमेदवार या पदांसाठी अर्ज करण्यास पात्र मानला जाईल. पात्र आणि इच्छुक उमेदवार GIC gicre.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. स्केल I पदांच्या ८५ जागा भरल्या जाणार आहेत. या पदांसाठी र्ज प्रक्रिया २३ डिसेंबरपासून सुरू झाली आहे. तुम्हालाही या पदांसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही 12 जानेवारी 2024 रोजी किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकता.

पगार:
मूळ वेतन रु ५०९२५ प्रति महिना आणि इतर स्वीकार्य भत्ते

जाहिरात-
https://www.gicre.in/images/FINAL_ADVERTISEMENT_FOR_2023_RECRUITMENT_22122023.pdf

आवेदन लिंक – https://www.gicre.in/en/

Tags

follow us