Gold and Silver Rate : जागतिक आर्थिक घडामोडीमुळं सोने, चांदीचे भाव रॉकेटच्या वेगाने वाढलं होते. दहा ग्रॅम सोनं 1 लाख 80 हजारावर गेलं होतं. एक किलो चांदीची किंमत चार लाखांपर्यंत गेली होती. त्यामुळे भारतीयांना सोने, चांदी खरेदी करताना पोटात गोळा आला होता. तर गुंतवणूक करणाऱ्यांना पैसे कमविले. पण आता सोन्याचा भाव कोसळून दहा ग्रॅमला तो एक लाखापर्यंत येऊ शकतो का ? काय म्हणतात या क्षेत्रातील एक्सपर्ट हे लेट्सअप मनीमधून जाणून घेऊया…(Gold and Silver Rate downward)
2025 आणि 2026 मध्ये सोन्यामध्ये गुंतवणूकदारांना मोठा परतावा मिळविलाय. पण या तेजीला आता ब्रेक मिळू शकते. सध्या कॅमोडिटी बाजारात म्हणजे भारतात MCX वर दहा ग्रॅम सोने 1 लाख 55 हजारांपर्यंत खाली आले आहे. आता त्यात पुन्हा घसरण होऊ शकते, असे बोलले जाते. त्याचे कारणं हे वेगवेगळे आहेत. तर आंतराष्ट्रीय स्तरावर कॉमक्सवर सोन्याचा भाव उच्चांकीदरावरून दहा टक्के खाली आला आहे. तर सोने तीन हजार डॉलर प्रति औंसपर्यंत खाली जाऊ शकतं. त्यामुळे भारतात सोन्याचा भाव कमी होऊ शकतात. परंतु सोने कमी होण्यामागे काही आंतरराष्ट्रीय कारणं आहेत. त्यातील कारणे जाणून घेऊया…
सोनं का घसरतंय ?
सोनं घसरणा मागे डोनाल्ड ट्रम्पच आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या आर्थिक निती, युद्धखोरंपणामुळे सोन्याची किंमती वाढल्या होत्या. आता त्यांच्यामुळे किंमती कमी होऊ शकतात. कारण रशिया आणि अमेरिका यांच्यामध्ये डॉलर आधारित व्यापार करार होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत ब्रिक्स देशांमध्ये म्हणजे ब्राझिल, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका हे देश डॉलरवर अंवलबून कमी करण्यासाठी काम करत होते. या देशांनी व्यापार करार आपल्या पैशांमध्ये म्हणजे करन्सीमध्ये किंवा सोन्यामध्ये व्यापार करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे अनेक देशांनी सोने खरेदी करून साठवून ठेवले. त्यामुळे जागतिकस्तरावर सोन्याची मागणी वाढली. त्यामुळे सोन्याच्या किंमतीही वाढल्या आहे. पण आता रशिया अमेरिकेबरोबर डॉलरमधून व्यापार करणार असेल, तर सोन्याची मागणी कमी होऊ शकता. दोन्ही देशातील डॉलरमधून व्यापार करार झाल्यात आंतरराष्ट्रीय बाजारात सोने तीन हजार डॉलर प्रती औंसपर्यंत येऊ शकते. त्यामुळे सोन्याच्या किंमती घटू शकतात.
हे दोन कारणं ही महत्त्वाचे ?
अमेरिकेतील महागाई निर्देशांकाचे आकडे आले आहेत. ते अपेक्षाप्रमाणे मजबूत आले आहेत. त्यामुळे अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हे बँक व्याजदरात कपात करणार नाही. व्याजदर जास्त राहिल्यास डॉलर मजबूत होईल. त्यामुळे गुंतवणूकदार हे सोन्यापेक्षा डॉलरमध्ये गुंतवणूक करतील. त्यामुळे सोन्याच्या किंमतीत आणखी घट होईल, असं आर्थिक तज्ज्ञ सांगतात. तसेच फेडरल रिझर्वे बँकेने व्याजदरात कपात न केल्यास सोन्याच्या किंमतीमध्ये आणखी घट होऊ शकते.
इतकी पडझड होऊल का ?
याबाबत सोन्यामध्ये गुंतवणूक करणारे सुमित गुप्ता म्हणतात, सेंट्रल बँक सोन्यामध्ये गुंतवणूक करत आहेत. त्यामुळे लाखापर्यंत खाली सोने येणार नाही. इतकी पडझड होणार नाही. आतापर्यंत वीस टक्के पडझड झालेली आहे. आणखी पाच ते सात टक्के करेक्शन येऊ शकतं. परंतु एक लाखापर्यंत सोनं खाली येऊ शकत नाही.
सोनं, चांदी आणि चमकेल -कोहली
अर्थशास्त्र आणि फायनान्स गुरू डॉ. शरद कोहली यांचे मतं वेगळं आहे. अमेरिका कर्जात बुडलेला देश आहे. डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यानंतर जगभरातील सेंट्रल बँकेने आर्थिकबाब मजबूत करण्यासाठी सोनं खरेदी केलयं. भारतीय रुपयाच्या तुलनेत डॉलर मजबूत आहे. पण येन, युरो, ब्रिटिश पौंड या करन्सीच्या तुलनेत डॉलर घसरलेली आहे. अमेरिका डॉलर इंडेक्स घसरलेला आहे. जागतिक स्तरावर 90 टक्के व्यवहार डॉलरवर होतात. त्यामुळे सोनं आता तरी घसरण्याची शक्यता कमी आहे. ट्रम्पचे यांचे जागतिक निर्णय असेच राहिले, तर सोनं, चांदी आणखी चमकेल, असं कोहली याचं मत आहे. तर ट्रम्प यांच्या मूडवरच सोने, चांदीचे भावही अंवलबून राहतील. तर चांदीचा उद्योगामध्ये वापर वाढला आहे. सोलर, इव्ही बॅटरी, एआय डेटा इक्विपमेंटमध्ये चांदीचा वापर वाढला आहे. चांदी पर्याय निर्माण झाल्यास चांदीमध्ये सर्वात मोठा क्रॅश येईल, असे भाकितही डॉ. कोहली यांचे आहे.
