आयपीएल सुरु होण्याआधी जिओने क्रिकेटप्रेमींना खुश केलं आहे. लाईव्ह मॅच पाहण्यासाठी बफरिंचा अडथळा येऊ नये म्हणून रिलायन्स जिओने तीन झकास प्लॅन लॉंच केले आहेत. या प्लॅनचा लाभ सर्वच युजर्स घेऊ शकणार आहेत. यामध्ये जिओच्या युजर्सना दररोज 3 जीबीपर्यंत डेटा मिळणार आहे. त्यासोबतच युजर्स क्रिकेट अॅड-ऑनद्वारे 150 GB पर्यंत डेटा मिळवू शकणार आहेत.
Pakistan : काश्मीरवर बोलले, पाकिस्तानींना भर कार्यक्रमातून हाकलले; अमेरिकेतील प्रकार..
219 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 3 जीबी डेटा मिळणार आहे. यामध्ये यूजर्सना फक्त 14 दिवसांची वैधता मिळणार आहे. या प्लॅनसह, ग्राहक 25 रुपयांच्या मोफत व्हाउचरद्वारे 2 GB मोफत डेटा घेऊ शकतात. या प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉल देखील उपलब्ध असणार आहे.
Stamp Duty : मुद्रांक शुल्क 7 टक्क्यांवरुन 8 टक्के होण्याची शक्यता, 1 एप्रिलपासून वाढण्याची शक्यता
तसेच 399 रुपयांच्या प्रीपेड क्रिकेट प्लॅनमध्ये युजर्सना 28 दिवसांची वैधता मिळणार आहे. यामध्येही दररोज 3 जीबी डेटा दिला जाणार आहे. तसेच कंपनीकडून 61 रुपयांचे मोफत व्हाउचर मिळणार असून यामध्ये 6 जीबी डेटा दिला जाणार आहे. सोबतच प्लॅनमध्ये तुम्हाला अमर्यादित व्हॉईस कॉल देखील मिळतात.
तर 999 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजर्सना 84 दिवसांची वैधता मिळणार आहे. दररोज 3 GB डेटासह 241 रुपयांचे फ्री व्हाउचरही मिळणार असून ज्यामध्ये 40 GB पर्यंत डेटा उपलब्ध असणार आहे.