Stamp Duty : मुद्रांक शुल्क 7 टक्क्यांवरुन 8 टक्के होण्याची शक्यता, 1 एप्रिलपासून वाढण्याची शक्यता

Stamp Duty : मुद्रांक शुल्क 7 टक्क्यांवरुन 8 टक्के होण्याची शक्यता, 1 एप्रिलपासून वाढण्याची शक्यता

मुंबई : तुम्ही जर घर, जमीन आणि तसम व्यव्हार करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. तर येत्या १ एप्रिलपासून राज्यात मुद्रांक शुल्कात वाढ होण्याची शक्यता आहे. मुद्रांक शुल्क ७ वरून ८ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई महानगर प्रदेशासह पुणे, पिंपरी- चिंचवड आणि नागपूर दस्तखरेदी गहाणखत व्यवहारामध्ये मुद्रांक शुल्कात वाढ होऊ शकते. त्यामुळे ३१ मार्चपर्यंत खरेदी- विक्री केल्यास १ टक्के बचतीची शक्यता आहे.

गेल्या काही वर्षात बांधकाम क्षेत्राकडे गुंतवणूक म्हणून पाहिले जात असते. एवढेच नाही, तर बांधकाम व्यावसायिक देखील खासगी गुंतवणूकदारांकडून निधी उपलब्ध करून घेत असतात. गुंतवणूक केलेल्या पैशाची खात्री मिळावी, फसवणूक होऊ नये, यासाठी अगोदर गुंतवणूकदार बांधकाम व्यावसायिकाकडून केवळ लेखी स्वरूपात पुरावा घेऊन ठेवत असत. तर काही वेळा ज्या प्रकल्पात गुंतवणूक केलेली आहे, त्या प्रकल्पातील दस्तनोंदणी स्वत:च्या नावावरून करून घेत असतो. मात्र अशा गुंतवणूकदारांना खरेदी केलेल्या सदनिकांची विक्री करताना मुद्रांक शुल्काचा पुन्हा भुर्दंड बसू नये, यासाठी १ वर्षाच्या आतमध्ये त्यांची विक्री करावी लागत.

विमानसेवा… पुणे – मुंबई प्रवास होणार अवघ्या तासाभराचा

मात्र, वर्षभराचा कालावधी उलटून गेल्यानंतर सदनिकांची विक्री केली, तर संपूर्ण मुद्रांक शुल्क (सध्या ७ टक्के) भरावे लागत आहे. परंतु बांधकाम पूर्ण होण्यास किमान अडीच ते तीन वर्ष लागतात. यामुळे गुंतवणूक करूनही गुंतवणुकदारांना त्याचा आर्थिकस्वरूपात फार फायदा होत नाही. परिणामी बांधकाम क्षेत्रात गुंतवणूक करणाऱ्यांचे प्रमाण कमी होत असल्याचे निदर्शनास आले. यामुळे मुद्रांक शुल्क 7 टक्क्यांवरुन 8 टक्के होण्याची शक्यता आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube